Vidhan Sabha Election 2024: उल्हासनगरमध्येही शरद पवार टाकणार नवा डाव, भाजपला आणणार अडचणीत?

मिथिलेश गुप्ता

02 Aug 2024 (अपडेटेड: 02 Aug 2024, 09:31 PM)

मुंबई नजीकच्या उल्हासनगरमध्ये शरद पवार हे आता विधानसभा निवडणुकीसाठी नवा डाव टाकू शकतात. जाणून घ्या येथे नेमकं काय राजकारण सुरू आहे.

उल्हासनगरमध्येही शरद पवार टाकणार नवा डाव

उल्हासनगरमध्येही शरद पवार टाकणार नवा डाव

follow google news

बातम्या हायलाइट

point

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीम ओमी कलानी यांचे गोव्यात अधिवेशन...

point

पप्पू कलानी यांचा मुलगा ओमी कलानी भाजपचे विद्यमान आमदार कुमार आयलानी यांच्या विरोधात निवडणूक लढवणार

point

अधिवेशनाला पप्पू कलानी यांच्यासह राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांची उपस्थिती

उल्हासनगर: महाराष्ट्र के उल्हासनगरचे चार वेळा आमदार असलेले आणि शरद पवारांचे प्रमुख नेते असलेले पप्पू कलानीचा मुलगा ओमी कलानी आता उल्हानगर मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. यासंदर्भात टीम ओमी कलानीने गोव्यात अधिवेशन घेतलं आणि जाहीरनामा जाहीर केला आहे. या अधिवेशनात पप्पू कलानी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांची विशेष उपस्थिती दिसून आली. त्यामुळे माढा पाठोपाठ उल्हासनगरमध्येही शरद पवार यांनी नवा डाव टाकला आहे. (vidhan sabha election 2024 will sharad pawar make a new move in ulhasnagar too will he bring bjp into trouble)

हे वाचलं का?

ओमी कलानी यांनी सांगितले की, त्यांना राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवायची आहे, मात्र शरद पवार यांच्या पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. उल्हासनगरमधून भाजपचे विद्यमान आमदार कुमार आयलानी यांच्या विरोधात आता ओमी कलानी हे निवडणूक लढवणार आहेत त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे.

हे ही वाचा>> माढ्यात मोहितेंनंतर पवारांचा दुसरा डाव! अजितदादांना धक्का, शिंदेंना घरातूनच चॅलेंज?

ओमी कलानी आणि पप्पू कलानी यांनी 2024 लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना उघडपणे पाठिंबा दिला होता. पण आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अधिवेशनाला हजेरी लावली होती. पण त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना तिकिटाबद्दल कोणतेही भाष्य केले नाही आणि आम्ही फक्त शरद पवार यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत, तिकीट शरद पवारच ठरवतील. 

TOK ने गोव्यात स्थानिक नगरसेवक, व्यापारी आणि शहरातील अनेक नेत्यांसह अधिवेशन आयोजित केले आणि 18 सदस्यांची (टीम ओमी कलानी) एक कोअर कमिटी स्थापन केली. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ.जयराम लुल्ला यांना TOK अध्यक्ष करण्यात आले आहे. TOK च्या कोअर कमिटीमध्ये व्यापारी, मुस्लिम आणि उत्तर भारतीयांसह सर्व समाजातील प्रतिनिधींचा समावेश आहे. 

◆ पप्पू कलानी, ओमी कलानी यांच्याकडून शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड अधिवेशनात पोहोचले, मात्र महाविकास आघाडीकडून केवळ ओमी कलानी यांनाच तिकीट दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले नाही. आगामी काळात ओमी कलानी महाविकास आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढवणार की अपक्ष उमेदवार राहणार याबाबत सस्पेन्स कायम आहे. 

◆ उल्हासनगरचे समीकरण

उल्हासनगरमध्ये एकूण मतदार 2,56,431 असून त्यात पुरुष 1,39,338 महिला 1,16,998 आणि 95 ट्रान्सजेंडर आहेत. 

◆ 2019
कुमार ऐलानी - 43,666 - 39.84%
ज्योती कलानी - 41,662 - 38.01% 

हे ही वाचा>> Uddhav Thackeray : विधानसभेआधीच महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरेंच्या नेत्याच्या विधानाने खळबळ

◆ 2014 
ज्योती कलानी - 43,760 - 35.00% कुमार ऐलानी- 41,897- 33.60% 

● कोण आहेत आमदार कुमार आयलानी 

उल्हासनगरचे विद्यमान आमदार कुमार आयलानी आहेत. कुमार आयलानी हे उल्हासनगर भागातून भाजपच्या तिकिटावर दोनदा आमदार झाले आहेत. एकेकाळी पप्पू कलानीला कोणीही हरवू शकणार नाही असे वाटत होते पण कुमार आयलानी यांनी निवडणुकीत कलानींचा दारुण पराभव केला. मात्र, कुमार आयलानी शहरवासीयांच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत, त्यामुळे त्यांच्याविरोधात लोकांमध्ये नाराजी असून, त्याचा परिणाम आगामी निवडणुकीवर होऊ शकतो. त्यांचे प्लस पॉईंट्स पण आहेत की, ते भाजपचे नेते आहेत, कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत त्यांचे चांगले संबंध आहे आणि त्यांना पुन्हा महायुतीचे तिकीट मिळाले तर काही चमत्कार घडू शकतो. 

● कोण आहे ओमी कलानी 

ओमी कलानी हे पप्पू कलानी यांचा मुलगा आणि टीम ओमी कलानी (TOK) चे प्रमुख म्हणून ओळखले जातात. ओमी कलानी हे उल्हासनगरचे दबंग नेते आणि व्यापारी आहेत. पप्पू कलानी तुरुंगात गेल्यानंतर ज्योती कलानी यांना आमदार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून पंचम कलानी यांना उल्हासनगर महापालिकेच्या महापौर केले. पप्पू कलानीप्रमाणेच ओमी कलानीचाही प्रभाव उल्हासनगरमध्ये वाढला आहे. आता ओमी कलानी कुटुंबाचा तिसरा चेहरा आहे. अशा परिस्थितीत ओमी कलानी निवडणुकीत आपल्या कुटुंबाचा दबदबा कायम ठेवण्यात यशस्वी होतात की नाही हे भविष्यात समजेल.

सुरेश उर्फ पप्पू कलानी... एक काळ असा होता जेव्हा संपूर्ण उल्हासनगर शहरावर पप्पू कलानीचे वर्चस्व होते. ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात. पप्पू कलानी हे उल्हासनगरचा खंबीर नेता म्हणून ओळखले जातात, त्याच्यावर दोन डझनहून अधिक गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्यावर हत्येचा आरोपही सिद्ध झाला आहे. अनेक वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते जेलमधून बाहेर आले. पप्पू कलानी यांनी आयुष्यात दोनदा तुरुंगातून विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली आहे. उल्हासनगरच्या सिंधी समाजात पप्पू कलानीचा चांगला प्रभाव आहे, अनेक जण त्यांना आपला मसिहा मानतात.

पप्पू कलानी 2013 मध्ये तुरुंगात गेल्यानंतर, त्यांची दिवंगत पत्नी ज्योती कलानी यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी लाटेत भाजपच्या कुमार आयलानी यांचा पराभव करून विजय मिळवला होता, त्यानंतर देशातील तसेच राज्यातील बदलत्या राजकीय वातावरणात कलानी यांनी काही काळासाठी भाजपमध्ये प्रवेश केला आणि याच काळात पप्पू कलानी यांची सून आणि ओमी कलानी यांच्या पत्नी पंचम कलानी या नगरसेविका म्हणून निवडून आल्या आणि पंचम कलानीला उल्हासनगरच्या महापौर पदावर बसवला. पण नंतर २०१९ मध्ये भाजपने ज्योती कलानी यांना विधानसभेचे तिकीट न दिल्याने कलानी कुटुंबाने पुन्हा एकदा राष्ट्रवादीशी (शरद पवार गट) हातमिळवणी केली आणि ज्योती कलानी यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली पण कुमार आयलानींसमोर त्यांचा पराभव झाला.

    follow whatsapp