Baramati : "पुरंदरचा मांडवली सम्राट"; विजय शिवतारेंवर सडकून टीका, पत्र व्हायरल

मुंबई तक

01 Apr 2024 (अपडेटेड: 01 Apr 2024, 11:05 AM)

Vijay Shivtare Baramati Lok sabha election 2024 : शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांच्यावर टीका करणारे पत्र बारामती लोकसभा मतदारसंघात व्हायरल झाले आहे.

विजय शिवतारे यांना एका अज्ञात कार्यकर्त्यांने पत्र लिहिले असून, त्यांच्यावर टीका केली आहे.

विजय शिवतारे यांनी बारामतीतून माघार घेतल्यानंतर एक पत्र व्हायरल झाले आहे, ज्यात त्यांच्यावर सडकून टीका करण्यात आली आहे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

विजय शिवतारेंनी भूमिका बदलल्याने संताप

point

बारामती लोकसभा मतदारसंघात व्हायरल झालं पत्र

point

अजित पवारांसोबतचा वाद विजय शिवतारेंनी मिटवला

Baramati Lok Sabha election 2024 : (वसंत मोरे, बारामती) बारामती लोकसभा मतदारसंघाकडे महाराष्ट्राचेच नाही, तर देशाचेही लक्ष आहे. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी थेट लढत होत असलेल्या मतदारसंघात शिवसेनेचे विजय शिवतारे यांनी बंडखोरीचे निशाण फडकावले होते. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर शिवतारेंनी तलवार म्यान केली. त्यानंतर ते टीकेचे धनी ठरताना दिसत आहे. शिवतारेंनी कोलांटउडी घेतल्याने एका कार्यकर्त्यांने त्यांच्यावर टीकेचे बाण डागले आहेत. (Vijay Shivtare Criticised by unknown supporter, letter goes viral)

हे वाचलं का?

बारामती लोकसभा मतदारसंघात सध्या व्हायरल पत्रांचीच जास्त चर्चा होताना  दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत भाष्य करणारे बारामतीकरांची भूमिका म्हणून एक पत्र व्हायरल झालं. त्यानंतर श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांवर केलेल्या टिकेनंतर आणखी एक पत्र वायरल झालं. 

आता विजय शिवतारेंना खडेबोल सुनावणारे पत्र व्हायरल झाले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पत्रातून शिवतारेंवर चांगलीच टीका करण्यात आली आहे. 

विजय शिवतरे यांनी गेल्या पंधरा दिवसात अजित पवार यांच्यावर टीकेचा भडीमार केला. आणि त्यानंतर अचानक भूमिका बददली. 

आधी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर ठाम असलेल्या शिवतारेंनी ऐनवेळी माघार घेतली. या सगळ्यांवर बोट ठेवत एका कार्यकर्त्याच्या मनातल्या भावना या पत्रातून व्यक्त करण्यात आल्या आहेत. 

शिवतारे यांना एका कार्यकर्त्याने लिहिलेले पत्र

विजय शिवतारे यांना एका कार्यकर्त्याने लिहिलेले पत्र.


विजय शिवतारेंवर संताप

आठ दिवसांपूर्वी अजित पवारांना उर्मट, गुर्मी असलेला नेता म्हणून संबोधणाऱ्या विजय शिवतरे यांची भूमिका अचानक कशी बदलली, याविषयीचे अनेक मुद्दे या पत्रात उपस्थित करण्यात आले आहेत. 

बारामती लोकसभा मतदारसंघात पाच लाख 80 हजार पवार विरोधी मते मिळवण्यासाठी बांधलेली वज्रमुठ कोणत्या कारणाने सुटली, असा सवाल देखील या पत्रातून विचारण्यात आला आहे. 

त्याचबरोबर गेल्या आठवड्यात नेमकी कोणाची स्क्रिप्ट तुम्ही वाचत होता, असा देखील सवाल या पत्रातून विचारण्यात आला आहे. याचे सर्व स्पष्टीकरण शिवतरे यांनी द्यावं असं देखील या पत्रात म्हटलं आहे.

    follow whatsapp