vilasrao deshmukh birthday anniversary : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षात अशा घटना घडल्या की, कधी कोण, कुठल्या महत्त्वाच्या पदावर येऊन बसेल, सांगता येत नाही. सर्व काही अनिश्चिततांचा खेळ होऊन बसला आहे. अलीकडेच्या काळात राजकीय भूकंप होत असले तरी महाराष्ट्राच्या राजकारणात अशा घटना यापूर्वीही घडल्या आहेत. असाच एक किस्सा आहे, भाजपाचे ज्येष्ठे नेते स्व. गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षनेते झाले त्याबद्दलचा. कारण मुंडे विरोधी पक्षनेते होण्यासाठी चक्क काँग्रेसनेही मदत केली होती आणि हा सगळा किस्सा खुद्द राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनीच एका कार्यक्रमात कथन केला होता.
ADVERTISEMENT
विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठा जनाधार असलेले नेते राहिले. त्यांचं वक्तृत्व आणि व्यक्तिमत्व दोन्हीही लोकांवर गारूड घालणार असंच होतं. गोपीनाथ मुंडे आधी आमदार राहिले, नंतर खासदार झाले. तर प्रसंग आहे गोपीनाथ मुंडे बीड जिल्ह्याचे खासदार झाले तेव्हाचा.
Video : बच्चू कडू यांना मिळालं नाही, ते एकनाथ शिंदे रवि राणा यांना देणार?
बीड जिल्ह्याचे खासदार झाल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांचा लोकविकास मंचतर्फे मराठवाडा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. विशेष म्हणजे हा पुरस्कार दिला गेला होता गोपीनाथ मुंडे यांचे मित्र असलेले विलासराव देशमुख यांच्या हस्ते. याच कार्यक्रमात बोलताना विलासराव देशमुखांनी गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षनेते कसे झाले, याबद्दलचा प्रसंग रंगवून सांगितला होता. यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडे यांचं तोंडभरून कौतूक करताना विरोधी पक्षनेता म्हणून त्यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारख आहे असंही म्हटलं होतं.
… अन् गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षनेते झाले, विलासरावांचा तो किस्सा काय?
या कार्यक्रमात बोलताना विलासराव देशमुख म्हणाले होते की,”गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षनेते झाले तो प्रसंग मला आजही आठवतो. सुधाकरराव नाईक हे राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळी मी संसदीय कार्यमंत्री होतो. मनोहर जोशी त्यावेळी विरोधी पक्षनेते होते. मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे यांचं प्रेम त्या दिवसांपासूनच आहे.”
Video >> भास्कर जाधवांना उदय सामंतांचं आव्हान, कोकणातला मोठा नेता घेतला सोबत
“त्याचवेळी भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ घटलं. तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीच्या आमदारांचं संख्याबळ वाढलं. पण एक दोन आमदार कमी पडत होते. मग मित्र म्हणून आम्ही ती व्यवस्था केली. हे गोपीनाथरावांना माहित आहे. मधुकरराव चौधरी विधानसभेचे अध्यक्ष होते. सभागृहात गोंधळ सुरू झाला. त्यांनी गोपीनाथरावांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर मी गोपीनाथरावांचा हात धरून मनोहर जोशींच्या जागेवर उभं केलं. त्यावेळी मनोहर जोशी वेलमध्ये चर्चेवर वाद घालत होते. त्यांनी वळून मागे बघितलं तेव्हा मुंडे त्यांच्या जागेवर उभे होते. त्यानंतर मनोहर जोशींनी सभात्याग केला”, विलासराव देशमुखांचा हा किस्सा ऐकून सभागृहात हास्याचे तुषार उडाले होते.
ADVERTISEMENT