Vishalgad Fort violence: विशाळगड प्रकरणी हायकोर्टाने दिला 'तो' मोठा आदेश, शिंदे सरकारला झटका

विद्या

19 Jul 2024 (अपडेटेड: 19 Jul 2024, 12:53 PM)

Bombay High Court on Vishalgad: विशाळगडावर झालेला हिंसाचार आणि त्यानंतर अतिक्रमणाविरोधात करण्यात आलेली कारवाई यावरून हायकोर्टाने राज्य सरकारला मोठा झटका दिला आहे. अतिक्रमणाविरोधात सध्या कारवाई सुरू आहे त्याला स्थगिती देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

विशाळगड प्रकरणी हायकोर्टाने दिला 'तो' मोठा आदेश, शिंदे सरकारला झटका

विशाळगड प्रकरणी हायकोर्टाने दिला 'तो' मोठा आदेश, शिंदे सरकारला झटका

follow google news

Vishalgad Encroachment: मुंबई: 'भर पावसात विशाळगडावरील बांधकामावर हातोडा कशाला चालवला?' असा सवाल विचारत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहेत . विशाळगडावरील हिंसाचार आणि अतिक्रमण तोडकाम याबाबत जी याचिका दाखल करण्यात आली होती त्यावर आज हायकोर्टाच(19 जुलै) सुनावणी पार पडली. यावेळी आंदोलकांनी मशिदीवरही हल्ला केल्याचा गंभीर आरोपही याचिकाकर्त्यांनी कोर्टासमोर केला आहे. यानंतर कोर्टाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेत विशाळगडावरच्या अतिक्रमण विरोधात जी तोडकाम कारवाई सुरू आहे त्या कारवाईला स्थगिती दिली आहे. (vishalgad fort violence bigh court stayed anti encroachment action at vishalgad a blow to the Shinde government)

हे वाचलं का?

विशाळगड प्रकरणावरुन हायकोर्टाने राज्य सरकारला सुनावले खडे बोल

या संदर्भात जे याचिकाकर्ते होते त्यांनी विशाळगडावर झालेला हिंसाचार आणि त्यानंतर प्रशासनाकडून जी कारवाई झाली त्याबाबत हायकोर्टाकडे तातडीने दाद मागितली याची गंभीर देखील घेत हायकोर्टाने राज्य सरकारला खडा सवाल केला की, मान्सून दरम्यान कोणत्याही बांधकामावर कारवाई करू नये. असे स्पष्ट आदेश असताना ही कारवाई का केली? 

तसेच त्या दिवशी त्या जमावाने जो हिंसाचार केला होता तेव्हा तिथलं स्थानिक प्रशासन नेमकं काय करत होतं? पोलिसांची जबाबदारी होती तिथली कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची.. ती का पार पाडली गेली नाही? असा सवाल विचारत कोर्टाने सरकारला धारेवर धरलं. 

याचिकाकर्त्यांनी त्या दिवशीच्या घटनेचे जे व्हिडीओ सादर केले त्यातून स्पष्ट दिसत होतं की, त्या दिवशी पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. याची गंभीर दखल घेत शाहूवाडी पोलीस स्थानकाच्या मुख्य अधिकाऱ्यांना पुढच्या सुनावणीला हायकोर्टाने हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. 

याचसोबत प्रशासनाकडून येथील बांधकामावर जो हातोडा चालवला जातोय की, जी कारवाई केली जातेय ती तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत. आताच्या घडीपासून तेथील एकही बांधकाम पाडू नये आणि सप्टेंबरपर्यंत म्हणजे जोपर्यंत मान्सून संपत नाही तोपर्यंत तोडकाम कारवाई स्थगित करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. त्यामुळे विशाळगडवासियांना हा हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. 

यासोबत या प्रकरणाला जो जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय त्याची देखील हायकोर्टाने गंभीर दखल घेत राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही प्रशासन या नात्याने पोलीस आणि राज्य सरकारची जबाबदारी आहे.

    follow whatsapp