'वाल्मिक कराडने खुनाच्या दिवशी देशमुखांना दिलेली धमकी..' कोर्टात प्रचंड खळबळजनक दावा

Walmik Karad Murder accused: संतोष देशमुख हत्या प्रकरणात कोठडी मिळावी यासाठी वाल्मिक कराडला SIT कडून आज (15 जानेवारी) कोर्टात हजर करण्यात आलं. दरम्यान, सुनावणीच्या वेळी SIT कडून या प्रकरणी अत्यंत खळबळजनक असे दावे करण्यात आले.

SIT कडून हत्या प्रकरणी नवे खुलासे  (फाइल फोटो)

SIT कडून हत्या प्रकरणी नवे खुलासे (फाइल फोटो)

मुंबई तक

• 03:33 PM • 15 Jan 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

संतोष देशमुख हत्या प्रकरणी SIT कडून कोर्टात खळबळजनक दावे

point

वाल्मिक कराडची कोठडी मिळावी यासाठी SIT कडून कोर्टात युक्तिवाद

point

युक्तिवादात SIT कडून हत्या प्रकरणी नवे खुलासे

Walmik Karad: ओमकार वाबळे, बीड: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड याच्यावर काल (14 जानेवारी) मकोका लावून त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं. पण या हत्येप्रकरणी चौकशीसाठी आणखी 10 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी यासाठी वाल्मिकला कोर्टात हजर करण्यात आलं. पण याच सुनावणी वेळी SIT च्या वतीने कोर्टात एक अत्यंत खळबळजनक दावा करण्यात आला आहे. (walmik karad had threatened santosh deshmukh on the day of the murder sit sensational claim in court)

हे वाचलं का?

सुरुवातीला वाल्मिक कराड याला केवळ खंडणी प्रकरणी आरोपी करण्यात आलं होतं. मात्र, काल याच प्रकरणी जेव्हा त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली त्यानंतर तात्काळ SIT ने वाल्मिकला खुनाच्या गुन्ह्यात आरोपी बनवून त्याच्यावर मकोका लावला. त्यामुळे आज कोठडी मिळविण्यासाठी SIT ने त्याला कोर्टात हजर केलं आहे.

हे ही वाचा>> Ajit Pawar आता धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार?, अजितदादांनी केलं मोठं विधान

SIT चा कोर्टात खळबळजनक दावा

सुरुवातीला SIT चे तपास अधिकारी अनिल गुजर यांनी कोर्टाला हत्या प्रकरणातील तपासाबाबतची माहिती दिली. त्यानंतर सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी युक्तिवादाला सुरुवात केली. 

युक्तिवादाच्या सुरुवातीलाच सरकारी वकिलांनी हत्या प्रकरणी अत्यंत खळबळजनक दावा केला. त्यांनी कोर्टाला माहिती देताना सांगितलं की, '9 डिसेंबरला खून झाला... या दिवशी दुपारी 3.20 ते 3.30 या दहा मिनिटात सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांचं संभाषण झालं आहे.' 

यावेळी काय बोलणं झालं? याची तपासणी करायची आहे. त्यामुळे वाल्मिक कराड यांची  10 दिवसाची कस्टडी SIT ने मागितली

हत्येच्या दिवशी वाल्मिक कराडने संतोष देशमुख यांना धकमी दिली होती - SIT चा दावा

दरम्यान, या प्रकरणी SIT एक अत्यंत धक्कादायक आरोपही वाल्मिक कराडवर लावला आहे. ज्याबाबत कोर्टात माहिती देताना सरकारी वकिलांनी सांगितलं की, 'हत्या प्रकरणातील अनेक आरोपी सराईत गुन्हेगार आहे. ते एकमेकांना ओळखतात. सर्वांनी एकत्रित येऊन आणि एकमेकांच्या संपर्कात राहून खंडणी सारखे गुन्हे केले.'

हे ही वाचा>> Walmik Karad Wife: वाल्मिक कराडची पत्नी म्हणते, 'महिनाभर आम्ही मरणयातना भोगतोय...'

'दरम्यान, संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याच दिवशी वाल्मिक कराडने संतोष देशमुख यांना धमकी दिली होती.' असा दावा एसआयटीकडून कोर्टात करण्यात आला आहे. 

वाल्मिक कराडवर मकोका का लावण्यात आला?

वाल्मिक कराडवर नेमका मकोका का लावण्यात आला याची माहितीही सरकारी वकिलांच्या वतीने कोर्टात देण्यात आली आहे. वाल्मिक कराड याच्यावर जे गुन्हे दाखल झाले होते त्याची यादीच सरकारी वकिलांनी कोर्टासमोर सादर केली आहे. MCOCA का आणि कसा लावण्यात आला यासाठी हे पुरावे SIT कडून देण्यात आले आहेत.

    follow whatsapp