Waqf Board : "वक्फ बोर्डाचा देशातील 994 मालमत्तांवर बेकायदेशीर...", संसदेत दिलेल्या उत्तरातून आकडेवाडीर समोर

मुंबई तक

10 Dec 2024 (अपडेटेड: 10 Dec 2024, 03:20 PM)

काही दिवसांपूर्वीच लातूरमध्ये वक्फ बोर्डाने 100 शेतकऱ्यांच्या जमिनीवर ताबा सांगत नोटीस पाठवल्याचा दावा करण्यात आला होता, ज्यामुळे मोठी खळबळ निर्माण झाली होती. त्यानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या होत्या. राज ठाकरे यांनी तातडीने वक्फ सुधारणा विधेयक लागू करण्याची मागणी केली होती.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

वक्फ बोर्डाकडे नेमकी किती मालमत्ता?

point

वक्फ बोर्डाबद्दल दिलेल्या उत्तरात केंद्राने काय म्हटलं?

Waqf Board : केंद्र सरकारने सोमवारी संसदेत सांगितलं, की देशभरात वक्फद्वारे एकूण 994 मालमत्तांवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण झाल्याची नोंद झाली आहे. त्यापैकी एकट्या तामिळनाडूमध्ये सर्वाधिक 734 मालमत्ता आहेत. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) नेते जॉन ब्रिटास यांच्या प्रश्नांना लेखी उत्तर देताना, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने वक्फवरील उपलब्ध माहितीचा संदर्भ देत सांगितलं की, देशात वक्फ कायद्यांतर्गत 8 लाख 72 हजार 352 स्थावर आणि 16 हजार 713 जंगम 'वक्फ मालमत्ता' नोंदणीकृत आहेत. काही दिवसांपूर्वीच लातूरमध्ये वक्फ बोर्डाने 100 शेतकऱ्यांच्या जमिनीवर ताबा सांगत नोटीस पाठवल्याचा दावा करण्यात आला होता, ज्यामुळे मोठी खळबळ निर्माण झाली होती. त्यानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या होत्या. राज ठाकरे यांनी तातडीने वक्फ सुधारणा विधेयक लागू करण्याची मागणी केली होती. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Mumbai Kurla BEST Bus Accident : अपघातग्रस्त BEST बस चालक 9 दिवसाआधीच नोकरीला लागला? तपासात धक्कादाय माहिती उघड

अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी वक्फ बद्दलच्या प्रश्नावर उत्तर देताना म्हटलं की, 'उपलब्ध माहितीनुसार 994 मालमत्तांवर वक्फने बेकायदेशीरपणे कब्जा केल्याची माहिती मिळाली आहे.' तसंच देशभरातील अशा एकूण 994 मालमत्तांपैकी तामिळनाडूमध्ये सर्वाधिक 734 मालमत्ता आहेत. त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये 152, पंजाबमध्ये 63, उत्तराखंडमध्ये 11 आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये 10 मालमत्ता आहेत.

2019 पासून वक्फला जमीन मिळालेली नाही

हे ही वाचा >> Markadwadi BJP Sabha : जिथे पवारांची सभा झाली, तिथेच भाजपची सभा, गावभर होर्डिंग्ज; "फेक नरेटीव्ह विरुद्ध...

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने सोमवारी राज्यसभेत सांगितलं की, केंद्र सरकारने 2019 पासून वक्फ बोर्डाला कोणतीही जमीन प्रदान केलेली नाही. केंद्र आणि राज्य सरकारांनी 2019 पासून आतापर्यंत वक्फ बोर्डाला दिलेल्या जमिनीच्या माहितीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्रालयाने सांगितले की, राज्य सरकारांनी दिलेल्या जमिनींबाबत कोणतीही आकडेवारी उपलब्ध नाही. तसंच गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या संबंधीत 2019 पासून भारत सरकारने वक्फ बोर्डाला कोणतीही जमीन प्रदान केलेली नाही. तसंच जेपीसीच्या अध्यक्ष जगदंबिका पाल म्हणाल्या की, या पॅनलने राज्य सरकार आणि त्यांच्या अधिकारक्षेत्रातील वादग्रस्त वक्फ मालमत्तेचा तपशील मागितला आहे.

    follow whatsapp