CM Eknath Shinde and Nana Patole Video on Manoj Jarange: मुंबई: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) अत्यंत आक्रमक भूमिका घेणारे मनोज जरांगे यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विधानसभेच्या परिसरातच एक मोठं विधान केलं आहे. त्यामुळे आता सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 'कुठलीही गोष्ट एका लिमिटच्या बाहेर गेली त्याचा कार्यक्रम करतोच मी...' असं विधान मुख्यमंत्री शिंदे यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्याबाबत बोलताना केलं आहे. त्यामुळे आता यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. (when things go out of bounds i do the correct programme cm eknath shinde spoke openly a direct warning to manoj jarang cm shinde and nana patole video)
ADVERTISEMENT
मनोज जरांगे यांनी काल (25 फेब्रुवारी) अंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उघड-उघड टीका केली होती. थेट फडणवीस यांचं नाव घेत जरांगे-पाटलांनी फडणवीसांवर निशाणा साधला होता. पण याच टीकेनंतर मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत मनोज जरांगेंना ठणकावलं होतं.
हे ही वाचा >> 'तू चूक केलीये', जरांगेंनी फडणवीसांना काय दिला इशारा?
अशात आज (26 फेब्रुवारी) एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगे यांना थेट इशाराच दिला आहे. विधानसभा परिसरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अडवून थेट असं म्हटलं की, मनोज जरांगेंचं नेमंक काय चाललंय.. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे थेट असंच म्हणाले की, 'लिमिटच्या बाहेर गोष्ट गेली की, त्याचा कार्यक्रमच करतो मी...'
नाना पटोले आणि मुख्यमंत्री शिंदेंमधील 'तो' संवाद
विधानभवन परिसरातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाहेर पडत असतानाच नाना पटोले यांनी त्यांना हाताला धरून सर्वांसमोरच मनोज जरांगे यांच्याविषयी छेडले.
मुख्यमंत्री शिंदे: हे बघा कुठलीही गोष्ट एका लिमिटच्या बाहेर गेली की त्याचा कार्यक्रम करतोच मी..
नाना पटोले: मला एक सांगा.. त्याचं लिमिट तुम्हीच वाढवलं ना..
मुख्यमंत्री शिंदे: मी सांगितलं जोपर्यंत प्रामाणिक कार्यकर्ता होता तोपर्यंत होता.
असं सूचक विधान करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांना थेट इशाराच दिला आहे.
दुसरीकडे मनोज जरांगे यांनी मागील 17 दिवसांपासून सुरू असलेलं त्यांचं उपोषण हे अचानक आज मागे घेतलं. यावेळी त्यांनी जाहीर केलं की, ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेणार आहेत आणि पुढील दोन दिवसात चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत.
जोशात मुंबईला निघालेले जरांगे पुन्हा अंतरवाली सराटीला का परतले?
'देवेंद्र फडणवीसला माझा जीव घ्यायचा आहे. त्याला मला संपवायचं आहे. त्याला माझं एन्काऊंटर करायचं आहे. त्याला मला पोलिसांकडून संपवायचं ना. मी येतो सागर बंगल्यावर... मी येतो... घे माझा जीव", असे म्हणत मनोज जरांगे अंतरवाली सराटी येथून निघाले. रात्री ते भांबेरी गावात थांबले मात्र, सकाळ होताच ते माघारी अंतरवाली सराटीला गेले.
हे ही वाचा >> जरांगेंनी घेतली बिनशर्त माघार, एका रात्रीत असं काय घडलं?
भांबेरी येथे माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, "पोलिसांचा आणि कायद्याचा मान सन्मान म्हणून... त्याचा (देवेंद्र फडणवीस) जाऊ द्या. सगळ्या राज्यात शांत राहायचं. आपण आता अंतरवालीत जाऊ. तिथे एक निर्णय घेऊ."
"दम लागतो ना त्याला. स्वागत आहे म्हणे सागर बंगल्यावर, हे स्वागत आहे का? तो रात्री करणार होता हे. त्याच्यापेक्षा दहापट मी हुशार आहे. फक्त तू गृहमंत्री झालेला आहे", असं म्हणत जरांगेंनी फडणवीसांना लक्ष्य केलं.
ADVERTISEMENT