Mayawati successor Akash Anand : बसपा अर्थात बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी एक मोठी घोषणा केली. बहुजन समाज पक्षाची बैठक लखनौमध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकी मायावती यांनी त्यांच्या वारसदाराची घोषणा केली. आकाश आनंद यांच्या नावाची उत्तराधिकारी मायावतींनी घोषणा केली. (Mayawati announces Akash Anand name as her successor)
ADVERTISEMENT
बहुजन समाज पक्षाच्या (बीएसपी) सुप्रीमो मायावती यांनी आज लखनौमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीत मोठा निर्णय जाहीर केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बसपाच्या या बैठकीत मायावतींनी सर्वांसमोर घोषणा केली की, बसपामध्ये त्यांचा उत्तराधिकारी आकाश आनंद असेल. या बैठकीत मायावतींनी पक्षाच्या सर्व राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांना आणि आता राज्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांना बोलावले आहे.
हेही वाचा >> इंदापुरात आमदार पडळकरांवर भिरकावल्या चप्पला; भुजबळ भडकले
मायावती आज (10 डिसेंबर) सकाळी त्यांचा भाचा आकाश आनंदसोबत बैठकीला पोहोचल्या. अलीकडेच बसपाने आकाश आनंद यांच्याकडे चार राज्यांची जबाबदारी सोपवली होती. गेल्या 6 वर्षांपासून आकाश आनंद यांची पक्षातील सक्रियता वाढत आहे.
सुरूवातीला मायावतींनी आकाशची त्यांच्यासोबत व्यासपीठावर ओळख करून दिली. मायावतींनी आकाश आनंद यांना पक्ष समन्वयकासारखे महत्त्वाचे पद दिले होते. आकाश यांनी इतर राज्यात संघटनेच्या बैठका आणि सभा घेतल्या होत्या.
हेही वाचा >> ‘शिंदेंनी नेतृत्वाच्या पाठीत खंजीर खुपसून आव्हान दिलं?’, सुनावणीत काय घडलं?
मायावती यांचा उत्तराधिकारी, कोण आहेत आकाश आनंद?
आकाश आनंद हे मायावतींचा धाकटा भाऊ आनंद कुमार यांचे सुपुत्र आहेत. त्यांचे शालेय शिक्षण गुडगावमध्ये झाले. आकाश यांनी पुढील शिक्षण लंडनमध्ये पूर्ण केले. आकाश आनंदने लंडनमधून मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए) केले आहे.
2017 मध्ये आकाश आनंद यांनी राजकीय कारकीर्दीला सुरूवात केली. पहिल्यांदा ते सहारनपूरच्या सभेत मायावतींसोबत स्टेजवर दिसले होते. आकाश हे सध्या पक्षाचे राष्ट्रीय समन्वयकही आहे. आकाश आनंद यांच्या राजकीय प्रवासाविषयी सांगायचे, तर त्यांनी 2017 मध्ये राजकारणात प्रवेश केला. मायावतींनी 2017 मध्ये एक मोठी सभा घेऊन आकाश आनंद यांना राजकारणात लॉन्च केले होते.
हेही वाचा >> फडणवीसांचं ‘ते’ पत्र, अजित पवार गटाने हात केले वर..! आता नवाब मलिकांचं काय होणार?
उत्तर प्रदेशात आकाश आनंद यांना लाँच केल्यानंतर बसपा सतत कमकुवत होत चालली आहे. 2017 आणि 2019 मध्ये पक्षाचा मोठा पराभव झाला होता, तर 2022 च्या यूपी निवडणुकीत बसपा फक्त एका जागेवरच विजयी झाली होती. ज्या राज्यांमध्ये पक्षाची मूळे जुनी आणि खोल आहे, तिथेही बसपाच्या कामगिरीत मोठी घसरण झाली आहे.
मायावतींनी आकाश यांना उत्तराधिकारी का केलं?
मायावतींनी आपल्या भाच्याला उत्तराधिकारी म्हणून घोषित करताच आकाश आनंद यांच्या संघटनात्मक क्षमतेबाबत राजकीय वर्तुळात नवा वाद सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बसपाने अनुभवी नेत्यांकडे दुर्लक्ष करून तरुण चेहऱ्यावर डाव का लावला? याबाबत अद्याप कोणतीही राजकीय प्रतिक्रिया आलेली नाही. पण त्यामागचा हेतू स्पष्टपणे दिसतोय की, मायावतींना आकाश आनंद यांना भविष्यातील राजकारणासाठी तयार करायचं आहे.
ADVERTISEMENT