Baba Siddique Death News: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची आज (12 ऑक्टोबर) रात्री 9.30 वाजेच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने अवघ्या मुंबई आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. (who was baba siddique who was killed in the shooting there was a lot of influence in bollywood too)
ADVERTISEMENT
आपल्या इफ्तार पार्ट्यांसाठी प्रसिद्ध असलेले बाबा सिद्दीकी यांचे अनेक दिग्गज सेलिब्रिटींसोबत अगदी जवळचे संबंध होते. एका घड्याळ दुरुस्त करणाऱ्या व्यक्तीचा मुलगा ते एक दिग्गज नेता असा बाबा सिद्दीकी यांचा आजवरचा प्रवास होता. जाणून घ्या नेमके कोण होते बाबा सिद्दीकी.
सलमान खान आणि शाहरूख खान यांच्यात समेट घडवून आणणारी व्यक्ती म्हणून बाबा सिद्दीकी हे सर्वात आधी चर्चेत आले होते. कारण त्यांच्याच इफ्तार पार्टीमध्ये बॉलिवूडच्या या स्टार्सचा समेट झाला होता. तेव्हापासून बाबा सिद्दीकी यांचं राजकीय वजन बरंच वाढलं होतं.
काय आहे बाबा सिद्दीकींची नेमकी कहाणी
बाबा सिद्दीकी यांचे वडील वांद्रे येथे घड्याळ बनवण्याचे काम करायचे. सिद्दीकी हे देखील आपल्या वडिलांना त्यांच्या कामात मदत करत असे. पण शिक्षण सुरू असतानाच बाबा सिद्दीक यांना राजकारणात रस निर्माण झाला. 1977 साली ते NSUI मुंबईचे सदस्य झाले. 1980 साली त्यांना वांद्रे युवक काँग्रेसचे सरचिटणीस आणि 1982 साली अध्यक्ष करण्यात आले. त्यानंतर त्यांचा मुंबई महापालिकेत प्रवेश झाला.
हे ही वाचा>> Baba Siddique Death : खळबळजनक! बाबा सिद्दीकींची हत्या, गोळीबारात झाला मृत्यू
मुंबई महापालिकेत त्यांनी स्वत:ला प्रस्थापित केलं. त्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली आणि वांद्रे पश्चिम मतदारसंघातून सलग तीन वेळा ते विधानसभेत पोहोचले. 2004 ते 2008 या काळात ते मंत्रीही होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडून बाबा सिद्दीकींचा पराभव झाला होता. सध्या त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी या जागेवरून आमदार आहे.
बॉलिवूडमध्ये बाबा सिद्दीकींचा का होता एवढा प्रभाव?
सुरुवातीपासूनच वांद्रे हे बाबा सिद्दीकी यांचं राजकीय कार्यक्षेत्र राहिलं आहे. ते ज्या भागातून नेतृत्व करतात तेथे मोठ्या प्रमाणात बॉलिवूड सेलिब्रिटी राहतात. त्यामुळे जेव्हा ते राजकारणात आपले पाय रोवत होते. त्यावेळी त्यांची भेट सुनील दत्त यांच्याशी झाली.
सुनील दत्त यांच्यानंतर बाबा सिद्दीकी यांची संजय दत्त याच्याशी ओळख झाली आणि अल्पावधीतच बाबा सिद्दीकी हे संजय दत्तच्या निकटवर्तींयांपैकी बनले. संजय दत्त हाच सिद्दीकी यांचा बॉलिवूडमधील ट्रम्प कार्ड ठरला.
हे ही वाचा>> Baba Siddique : महिनाभरात मुंबई काँग्रेसला दुसरा धक्का! अजित पवारांच्या पक्षात करणार प्रवेश
सुरुवातीला संजय दत्त आणि सलमान खान हे खूप चांगले मित्र होते. त्यामुळे संजय दत्तने सिद्दीकी आणि सलमान खान यांची भेट घडवून आणली आणि इथूनच बाबा सिद्दीकीच्या इफ्तार पार्टीची कहाणी सुरू झाली, जिथे अवघं बॉलिवूड लोटत होतं.
सलमान खान आणि बाबा सिद्दीकी यांच्यातील मैत्री एवढी घट्ट होती की, सलमानने बाबा सिद्दीकी यांची मालमत्ता भाड्याने घेतली. हिंदुस्तान टाइम्सच्या एका वृत्तानुसार, सलमानने वांद्रे येथे सलमान खान व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत भाड्याने एक डुप्लेक्स अपार्टमेंट घेतला होता. मकाबा हाइट्समध्ये असलेल्या या डुप्लेक्सचे मालक हे बाबा सिद्दीकी आणि त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी आहेत.
बाबा सिद्दीकींचं जोडलं गेलेलं दाऊद इब्राहिमशी नाव...
मुंबईतील अनेक दंतकथांमध्ये बाबा सिद्दीकी यांना बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डमधील पूल म्हटलं गेलंय. याचं कारण म्हणजे संजय दत्तचे अंडरवर्ल्डशीही संबंध आणि संजय दत्तचे बाबा सिद्दीकी यांची त्यांचाशी असलेली जवळीक यामुळे वारंवार त्यांचं अंडरवर्ल्डशी नाव जोडलं जात होतं.
एवढंच नव्हे तर दाऊद आणि डी कंपनीशी संबंध असल्याची चर्चाही वारंवार होत असे. पण इथे एक ट्विस्ट आहे. जर त्यांचा दाऊदशी संबंध असेल तर दाऊद त्यांना का धमकावेल?
वास्तविक, सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, बाबा सिद्दीकी आणि दाऊदचा निकटवर्तीय अहमद लंगडा यांच्यात मुंबईतील एका भूखंडावरून वाद झाला होता. यानंतर छोटा शकीलने बाबा सिद्दीकी यांना 'या प्रकरणापासून दूर राहा, अन्यथा परिणाम चांगला होणार नाही', अशी धमकी दिली होती.
ज्यानंतर बाबा सिद्दीकी यांनी या प्रकरणी मुंबई पोलिसात तक्रारही केली होती. अखेर पोलिसांनी अहमद लंगडा याला अटक करून मकोका लावला होता. याचाच राग येऊन 2013 साली दाऊदने बाबाला फोनवर धमकी दिली होती. त्यावेळी दाऊद फोनवर असं म्हणाला होता की, 'राम गोपाल वर्मा से बोलकर तुम्हारी फिल्म बनवा दूंगा, ‘एक था एमएलए’!
बाबा सिद्दीकींवर ईडीने केलेली कारवाई
मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन घोटाळ्यात आरोपी म्हणून ज्यांची नावं होती त्यात बाबा सिद्दीक यांचाही समावेश करण्यात आला होता. ज्याप्रकरणी ईडीने सिद्दीकींवर छापेमारीही केली होती. 2017 मध्ये याच प्रकरणाशी संबंधित आणि मनी लाँड्रिंगशी संबंधित एका प्रकरणासंदर्भात ईडीने त्यांच्या घरावर छापा टाकला होता. मात्र, त्यावर पुढे काही फार कारवाई झाली नाही.
बाबा सिद्दीकी हे केवळ नेते नव्हते. तर बी-टाऊनमध्येही त्यांचा बराच दबदबा होता. अनेक मोठे-मोठे कलाकार हे सिद्दीकींचा शब्द टाळत नव्हते. त्यामुळेच आज त्यांच्या निधनाने केवळ राजकीय वर्तुळातच नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील खळबळ माजली आहे.
ADVERTISEMENT