Sanjay Raut :’…तो अदृश्य फोन कोणाचा ?’; राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप

मुंबई तक

• 05:38 AM • 03 Sep 2023

Sanjay Raut : अंतरवाली सराटीतील मराठा आंदोलनावर लाठीचार्ज झाल्यानंतर आता खासदार संजय राऊत यांनी सरकारला धारेवर धरले आहे.

mumbaitak

mumbaitak

follow google news

Sanjay Raut : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे सहाव्या दिवशीही आंदोलन सुरु आहे. या आंदोलनावरून आज पुन्हा एकदा खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणाविषयी (Maratha Reservation) चाललेले आंदोलन चिरडून टाकण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करण्यासाठी मंत्रालयातून अदृश्य फोन कोणाचा गेला हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी जाहीर करावे असं स्पष्ट मत संजय राऊत यांनी व्यक्त केले. (invisible phone came from the ministry lathicharge Maratha agitation, Sanjay Raut)

हे वाचलं का?

फोन दिल्लीवरून आलेला का ?

मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी आंदोलन चालले होते. मात्र सरकारने त्यांना जबरदस्तीने हे आंदोलन सोडण्यासाठी आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी बळजबरी का करण्यात आली. त्यांनी शांततेने केलेल्या आंदोलनाला सरकारने लाठीचार्ज करुन ते दडपण्याचा काय प्रयत्न केला. हे मराठा आंदोलन चिरडून टाकण्यासाठी आणि आंदोलनकर्त्यांवर लाठीहल्ला करण्यासाठी मंत्रालयातून तो आदृश्य फोन कोणाचा आला होता. त्यांनी ते आंदोलन सोडावे यासाठी यासाठी गृहमंत्र्यांचा होता, उपमुख्यमंत्र्यांचा होता की, दिल्लीवरून फोन आलेला हे एकदा सरकारने जाहीर करावे असं स्पष्ट मत संजय राऊत यांनी सांगितले.

एकीकडे चर्चा, दुसरीकडे लाठीचार्ज

मराठा आरक्षणासाठी हे काही राज्यातील पहिलेच आंदोलन नाही. याआधीही महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात आणि तालुक्याच्या ठिकाणी मराठा आंदोलकांनी शांततेने आंदोलन केले आहे. मात्र हे आंदोलन सरकारला का चिरडावे वाटले. एका बाजूला सरकार चर्चा करते आहे, तर दुसऱ्या बाजूला लाठीचार्ज करते असा दुटप्पीपणा हे सरकार का करत आहे असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

हे ही वाचा >> INDIA@100: भारताचं अन्न क्षेत्र अन् स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने पुढचं पाऊल

इंडियावरचे लक्ष विचलित करण्यासाठी

देशातील अनेक दिग्गज नेते मुंबईतील इंडियाच्या बैठकीसाठी आले होते. त्यामुळे राज्यातील आणि देशातील मीडियाचे लक्ष इंडियाच्या बैठकीकडे लागून राहिले होत. त्या इंडियाच्या बैठकीवरचे लक्ष विचलित करणयासाठीच जाणीवपूर्वक शांततेने चाललेल्या मराठा आंदोलनावर सरकारकडून लाठीचार्ज करुन इंडिया बैठकीवरचे लक्ष उचलित केले असल्याच गंभीर आरोपही खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

अजित पवारांचे काय मत

जालन्यात मराठा आरक्षणासाठी चाललेले आंदोलन हे शांततेच्या मार्गाने चालू होते. मात्र त्यावर लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट करावे असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केले. अजित पवार हे स्पष्टपणे सांगणार आहेत का मंत्रालयातून नेमका कोणाचा फोन आंदोलन चिरडून टाकण्यासाठी गेला होता असा सवाल त्यांनी अजित पवार यांनी केला आहे.

हे ही वाचा >> Amravati crime : दिवाण बेडमधून पडत होतं रक्त, आतमध्ये सापडले मायलेकाचे मृतदेह

गृहमंत्र्यांचे अपयश

राज्य सरकारला हे आंदोलन चिरडायचं आहे. त्यामुळेच अशाप्रकारचा निघृणपणे निर्णय घेण्यात आले. त्यांच्या या कृत्तीतून हे दिसते की, हे आंदोलन चिरडून टाकायचे आहे. शांततेने आणि लोकशाहीच्या मार्गाने चाललेल्या आंदोलनावर जर लाठीचार्ज करावा वाटत असेल तर हे गृहमंत्र्यांचे अपयश असल्याचा ठपकाही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठेवला आहे. राज्यात अनेक ठिकाणी पोलिसांचे वाहने जाळली जात आहेत, विरोधकांसाठी पोलीस बळाचा वापर केला जात आहे. त्यामुळे हे असे प्रकार घडत असतील तर हे गृहमत्र्यांचे अपयश आहे असंही त्यांनी म्हटले आहे.

मराठा आंदोलन संवेदनशील

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणासाठी चाललेले आंदोलन हे संवेदनशील आहे. तरीही या आंदोलनावर गृहमंत्र्यांना लाठीचार्ज करावा असा का वाटला असा सवाल करत संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

    follow whatsapp