Chhagan Bhujbal : शरद पवारांची भेट का घेतली? भुजबळांनी अखेर कारण केले उघड

ऋत्विक भालेकर

15 Jul 2024 (अपडेटेड: 15 Jul 2024, 01:29 PM)

Chhagan Bhujbal meets Sharad Pawar : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

A case was filed in 2015 against NCP leader Chhagan Bhujbal and 16 others by the ACB, alleging that a developer firm was favoured by him for a project on land owned by the Regional Transport Office.

A case was filed in 2015 against NCP leader Chhagan Bhujbal and 16 others by the ACB, alleging that a developer firm was favoured by him for a project on land owned by the Regional Transport Office.

follow google news

बातम्या हायलाइट

point

छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट का घेतली?

point

पवारांसोबत भुजबळ यांची काय झाली चर्चा?

point

सिल्व्हर ओकवर छगन भुजबळ का गेले होते?

 Chhagan Bhujbal Sharad Pawar Meeting Latest News : छगन भुजबळ यांनी आज मुंबईतील सिल्व्हर ओक येथे जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. बारामती येथे झालेल्या कार्यक्रमात भुजबळ यांनी पवारांवर टीका केली होती. त्यानंतर आज भेट घेतल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. अखेर पत्रकार परिषद घेत भुजबळ यांनी मौन सोडले. (Why did Chhagan Bhujbal Meets to Sharad Pawar)

हे वाचलं का?

बारामती येथील जन सन्मान रॅली कार्यक्रमामध्ये बोलताना छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. शरद पवार यांनी आरक्षणासारख्या सामाजिक प्रश्नावर पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहनही भुजबळ यांनी केले होते. त्यानंतर त्यांनी आज पवारांची भेट घेतली.

छगन भुजबळ शरद पवारांना का भेटले?

शरद पवार यांच्या भेटीनंतर बोलताना छगन भुजबळ म्हणाले, "मी पवारसाहेबांकडे गेलो होतो. मी त्यांची वेळ घेतली नव्हती. ते घरी आहेत, इतकं मला कळलं होतं. मी गेलो तेव्हा ते तब्येत बरी नसल्याने झोपलेले होते. मी एक दीड तास थांबलो."

हेही वाचा >> "क्रॉस व्होटिंगमध्ये माझे नाव आल्याचे पाहिले अन्...", आमदार चौधरींनी सोडलं मौन

"ते उठले आणि त्यांनी मला बोलावलं. तब्येत बरी नसल्याने ते बिछान्यावरच झोपलेले होते. मी तिथेच खुर्ची घेऊन बसलो. आम्ही जवळपास दीड तास चर्चा केली. मी त्यांना सांगितले की, मी राजकारण घेऊन आलेलो नाही. मी मंत्री, आमदार किंवा कुठली पक्षीय भूमिका माझी नाही."

महाराष्ट्रात स्फोटक परिस्थिती निर्माण झालीये -छगन भुजबळ

"महाराष्ट्रात ओबीसींना आरक्षण देण्याचे काम तुम्ही राबवले. आता राज्यातील काही जिल्ह्यात स्फोटक परिस्थिती निर्माण झालेली आहे. काही लोक मराठा समाजाच्या हॉटेल, दुकानावर जात नाही. ओबीसींच्या दुकानावर मराठा समाज जात नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे."

हेही वाचा >> ठाकरे म्हणाले, 'मविआ'तून बाहेर पडेन; 'त्या' बैठकीत काय घडलं?

"राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे की, राज्यात शांतता निर्माण झाली पाहिजे. त्यांना आठवण करून दिली की, बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देताना असाच मराठवाडा पेटला होता. तो शांत करून तुम्ही निर्णय घेतला."

"आज अशी परिस्थिती आहे आणि तुम्ही आला नाही. त्यांचं असं म्हणणं होतं की, मुख्यमंत्री जरांगेंना भेटले. त्यांनी जरांगेंशी काय चर्चा केली, आश्वासने दिली हे आम्हाला माहिती नाही. तुम्ही हाकेंचं उपोषण सोडलं, त्यांना तुम्ही काय सांगितलं, त्याचीही आम्हाला कल्पना नाही, असे पवारसाहेब मला म्हणाले", अशी माहिती भुजबळ यांनी दिली.

तुम्ही राज्यातील ज्येष्ठ नेते, तुम्ही पुढाकार घ्या, भुजबळांनी पवारांकडे काय केली मागणी? 

"मी पवारसाहेबांना सांगितले की, आम्ही हाके आणि इतरांना सांगितले की, उपोषण सोडा. उपोषण करून, वातावरण तंग करून चर्चा होऊ शकणार नाही. आपण चर्चा करून मार्ग काढला पाहिजे एवढंच सांगितले. आता जरांगेंना जे मंत्री भेटले. आणखी कुणी भेटले... त्यांनी काय सांगितलं मला काही माहिती नाही. ते तुम्ही मुख्यमंत्र्‍यांना विचारलं पाहिजे. तुम्ही आज राज्यातील ज्येष्ठ नेते आहात. सर्व समाज घटकांची काय परिस्थिती आहे गावागावांतील, जिल्ह्याजिल्ह्यात याचा अभ्यास तुम्हाला जास्त आहे."

हेही वाचा >> विशाळगडावर दगडफेक, तोडफोड कसा झाला राडा? Video पहा

"आम्ही मंत्री झालो. मुख्यमंत्री झालो म्हणजे आम्हाला सगळाच अभ्यास आहे, असे समजायचे कारण नाही. त्यामुळे तुम्ही यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. ते (शरद पवार) म्हणाले, आम्ही आलो नाही कारण आम्हाला काही माहितीच नाही की, तुमची काय चर्चा झाली. आणि ५० लोकांमध्ये कशी काय चर्चा होऊ शकते?", असे पवार मला म्हणाले, असे भुजबळांनी सांगितले. 

 

    follow whatsapp