Sharad pawar announced retirement from party president : महाराष्ट्रात सर्वत्र एकाच विषयावर चर्चा सुरू आहे, तो म्हणजे शरद पवारांनी अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याची केलेली घोषणा. शरद पवारांनी अचानक घोषणा करून पक्षालाच नव्हे तर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यांच्या या निर्णयावर वेगवेगळ्या अंगाने भाष्य केलं जात असून, शरद पवारांनी हा निर्णय घेण्याआधी पक्षातील नेत्यांनाच कल्पना का दिली नाही? असा प्रश्नही पुढे आला आहे. त्याबद्दल आता शरद पवारांनीच पक्षातील नेत्यांशी बोलताना खुलासा केला आहे.
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कार्यकर्त्यांबरोबर महाराष्ट्राचं लक्ष सिल्व्हर ओक कडे लागलं आहे. शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर नेते कार्यकर्ते याला विरोध करत आहे. पक्षाध्यक्षपद सोडण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी पक्षातून होत असून, शरद पवार दोन दिवसांनी याबद्दल भूमिका मांडणार आहेत.
नेत्यांना धक्का, कार्यकर्तेही गोंधळे
शरद पवारांनी जाहीर केलेला निर्णय पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना अनपेक्षित होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करताना ही बाब बोलून दाखवली. अजित पवार यांनीही शरद पवार हे लोकशाही मानणारे असून, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नेत्यांनी बोलून निर्णय घेतात. मात्र, हा निर्णय घेताना त्यांनी कुणालाही कल्पना दिली नाही आणि चर्चाही केली नाही, असं पवार म्हणाले.
हेही वाचा >> ‘राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्ष व्हायचं नाही’, अजित पवारांनी मांडली सविस्तर भूमिका
त्यामुळे शरद पवार यांनी पक्षातील नेत्यांना कल्पना न देता पक्षाध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हा निर्णय का घेतला, असा प्रश्न समोर आला. या प्रश्नाचं उत्तरही पवारांनी पक्षातील नेत्यांशी बोलताना दिलं.
…म्हणून पक्षाध्यक्षपद सोडण्याचा निर्णय शरद पवारांनी एकट्यानेच घेतला
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा शरद पवारांनी केली. त्यानंतर पक्षातील नेत्यांकडून संपर्क आणि चर्चा केली गेली. पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांशी शरद पवारांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी निर्णय घेण्यामागची भूमिका स्पष्ट केली.
वरिष्ठ नेत्यांशी बोलताना शरद पवारांनी सांगितलं की, हा निर्णय आपल्याला कोणत्या ना कोणत्या दिवशी घ्यावाच लागणार होता.
हेही वाचा >> शरद पवारांच्या निर्णयानंतर अजित पवार कार्यकर्त्यांवर भडकले, सगळेच चक्रावले
यावेळी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी शरद पवारांना सांगितलं की, किमान पक्षातील काही नेत्यांशी बोलायला हवं होतं. चर्चेतून कुठला तरी तोडगा निघाला असता. त्यावर शरद पवार यांनी सांगितलं की, जर मी हा निर्णय आधीच उघड केला असता, तर मला निर्णय घेण्यापासून थांबवलं गेलं असतं.
शरद पवारांना नवा पक्षाध्यक्ष का हवाय?
पक्षाध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय शरद पवारांनी घेतला. याचे वेगवेगळे अर्थ राजकीय वर्तुळात आणि राजकीय विश्लेषक लावत आहेत. शरद पवारांचा निर्णय अजित पवारांना अडचणीत आणणारा असल्याचंही बोललं जात आहे. दरम्यान, पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी बोलताना शरद पवारांनी स्पष्ट केलं की पक्षाचा उत्तराधिकारी ते कार्यरत असतानाच व्हावा, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळेच ते हा निर्णय घेतला आहे.
ADVERTISEMENT