Yogendra Pawar Reaction Ncp Politics : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार गेल्या काही दिवसांपासून राजकारणात चांगलेच चर्चेत आहेत. राष्ट्रवादीत काँग्रसमध्ये होत असलेल्या प्रत्येक घडामोडींवर युगेंद्र पवार (Yogendra Pawar) आपली बेधडक भूमिका मांडताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत अजित पवारांचे सख्खे पुतणे असलेले युगेंद्र पवार नेमकी कुणाची साथ देणार, अजित पवार (Ajit Pawar) की शरद पवार ? असा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर या प्रश्नावर युगेंद्र पवार यांनी स्पष्टच उत्तर दिले आहे. एक नातू म्हणून मी माझ्या शरद पवारांसोबत (sharad Pawar) असल्याये युगेंद्र पवार यांनी स्पष्ट केले आहे. (yogendra pawar ncp politics sharad pawar ajit pawar baramati constituency elction supriya sule vs sunetra pawar turha ncp symbol)
ADVERTISEMENT
युगेंद्र पवार टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीतील घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी (तुतारी फुंकणारा माणूस) हे चिन्ह दिले होते. या चिन्हावर बोलताना युगेंद्र पवार म्हणाले की, तुतारी हे पक्षचिन्ह सगळीकडे पोहोचलं आहे. कारण आता समाजमाध्यमे आहेत, त्यामुळे ते शक्य झाल्याचे युगेंद्र पवार सांगतात.
हे ही वाचा : Dada Bhuse Mahendra Thorve : 'हो, आमच्यात वाद झाला', थोरवेंनी सांगितलं भांडणाचं कारण
बारामतीतून कोण जिंकणार?
बारामती लोकसभा मतदार संघात खासदार सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी थेट लढत होणार आहे. या लढतीवर बोलताना युगेंद्र पवार म्हणाले की, बारामती लोकसभा मतदार संघातून सुप्रिया सुळे या पराभूत होतील, असं मला वाटतं नाही. सुप्रिया सुळे यांनी खूप कामं केली आहेत. त्यामुळे त्या मोठ्या मताधिक्याने निवडून येतील,असे युगेंद्र पवार यांनी सांगितले. तसेच सुनेत्रा पवार बारामतीत उभ्या राहतील, असं मला वाटतं नाही. बारामती लोकसभा मतदार संघात पवार विरूद्ध पवार लढत होईल, असे मला वाटत नाही, असे देखील युगेंद्र पवार यांनी सांगितले.
'अजित पवारांचं बंड कुणालाच आवडलं नाही'
राष्ट्रवादीत अजित पवार यांनी केल्या बंडावर युगेंद्र पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर युगेंद्र पवार म्हणाले की, कुठल्याही पक्षात किंवा कुटुंबात फुट पडली तर ती लोकांना आवडत नाही. कुटुंबातील व्यक्ती म्हणून मला देखील अजित पवारांचं बंड आवडलेलं नाही आहे. पक्षात असं काही होईल असे मला वाटले देखील नव्हते. कुटुंबातील सर्वच लोकांना हे आवडलं नाही आहे, असं व्हायला नको होतं असे युगेंद्र पवार सांगतात.
हे ही वाचा : BJP First List : मोदी वाराणसी, तर शाह...; भाजपची 100 नावं निश्चित
राष्ट्रवादीतील फुटीनंतर आता शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत. यामध्ये दोन्ही गटाच्या आमदारांनी आणि खासदारांनी आपआपली भूमिका मांडली. मात्र पवार कुटुंबात कुणाची कुणाला साथ आहे. हे अद्याप समोर आलं नव्हतं. असे असताना आता युगेंद्र पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे. ''एक नातू म्हणून मी माझ्या आजोबांच्या (शरद पवार) सोबत आहे. आम्ही सगळे पुरोगामी विचारांचे लोक आहोत. त्यामुळेच आम्ही शरद पवारांना साथ देणार असल्याचे'' युगेंद्र पवार यांनी स्पष्ट केले आहे.
ADVERTISEMENT