खुर्च्या फेकल्या, तुफान हाणामारी…युवक कॉग्रेसच्या बैठकीत काय घडलं?

मुंबईत युथ कॉंग्रेसच्या बैठकीत तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. या बैठकीत दोन गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्याची आणि अंगावर धावून मारामारी केल्याचीही घटना समोर आली आहे. कुणाल राऊत यांना बदलण्याच्या मागणीवरून हा राडा झाल्याची माहिती आहे.

youth congress meeting two group clash between together kunal raut congress mumbai

youth congress meeting two group clash between together kunal raut congress mumbai

मुंबई तक

17 Jun 2023 (अपडेटेड: 17 Jun 2023, 12:29 PM)

follow google news

Maharashtra Political News : मुंबईत युथ कॉंग्रेसच्या बैठकीत (Youth Congress meeting) तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. या बैठकीत दोन गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्याची आणि तुफान हाणामारी केल्याचीही घटना समोर आली आहे. कुणाल राऊत यांना बदलण्याच्या मागणीवरून हा राडा झाल्याची माहिती आहे. (youth congress meeting two group clash between together kunal raut congress mumbai)

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत आज युथ कॉंग्रेसच्या बैठकीचे (Youth Congress meeting) आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी.व्ही. श्रीनिवास आणि भारतीय युवक काँग्रेसचे प्रभारी कृष्णा अल्लावरू हे युवक काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी मुंबईत पोहोचले होते. मात्र बैठक सुरू असतानाच युवक कॉंग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत (Kunal Raut) यांच्या विरोधात एक गट आक्रमक झाला होता. तर युवक कॉंग्रेसच्या चार उपाध्यक्ष यांनी कुणाल राऊत यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत त्यांना बदलण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर कुणाल राऊत यांचे समर्थक संतप्त झाले होते. यानंतर दोन गटात तुफान राडा झाला होता. या राड्यात दोन्ही गटातील नागरीकांनी एकमेकांवर खुर्च्या भिरकावल्या होत्या. तसेच दोन्ही गटात हाणामारी देखील झाली होती. शिवराज मोरे आणि अनिकेत म्हात्रे या गटाने कुणाल राऊत यांना विरोध केला होता. या विरोधानंतर हा मोठा राडा झाला होता.

कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी या राड्यावर प्रतिक्रिया दिली आहे. युवक काँग्रेस (Youth Congress meeting) आहे ती, काही विषयावरून मतभेद होतं असतात, वाद विवाद होतं असतात, त्यातूनच पूढे नेतृत्व घडत असत, असे बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.

    follow whatsapp