Ind Vs Aus : जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते ऑस्ट्रेलियन टीम

मुंबई तक

• 12:03 PM • 08 Feb 2023

Border Gavaskar Trophy : मुलं फेब्रुवारीतील व्हॅलेंटाईन वीकची (Valentine Week) वाट पाहत नसून बॉर्डर-गावसकर ट्रॉफीची (Waiting For Border Gavaskar Trophy) वाट पाहत आहेत, असा एक विनोद गेल्या काही दिवसांपासून (Viral On Social Media) सोशल मीडियावर फिरत आहे. ही प्रतीक्षा आता संपत असून 9 फेब्रुवारीला सकाळी 9 वाजता ही मालिका सुरू होत आहे. क्रिकेटच्या मैदानावर (India […]

Mumbaitak
follow google news

Border Gavaskar Trophy : मुलं फेब्रुवारीतील व्हॅलेंटाईन वीकची (Valentine Week) वाट पाहत नसून बॉर्डर-गावसकर ट्रॉफीची (Waiting For Border Gavaskar Trophy) वाट पाहत आहेत, असा एक विनोद गेल्या काही दिवसांपासून (Viral On Social Media) सोशल मीडियावर फिरत आहे. ही प्रतीक्षा आता संपत असून 9 फेब्रुवारीला सकाळी 9 वाजता ही मालिका सुरू होत आहे. क्रिकेटच्या मैदानावर (India Vs Austrelia) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हे युद्ध प्रत्येक क्रिकेट चाहत्याला आवडते. Border Gavaskar Trophy starts from tomorrow

हे वाचलं का?

World Cup 2023 मध्ये भारतीय संघात कोण-कोण असू शकतं?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताची कोणतीही मालिका पाहिली तर प्रत्येक मालिकेत तुम्हाला धावांचे ढीग, विकेट्सची झुंबड आणि स्लेजिंगचे अनेक क्षण पाहायला मिळतील. जिथे भारत आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू एकमेकांना पराभूत करण्यासाठी पूर्णपणे आक्रमक आहेत. रिकी पाँटिंगपासून ते अँड्र्यू सायमंड्स, सौरव गांगुलीपासून विराट कोहलीपर्यंत सगळेच मैदानावर आक्रमक भूमिका घेत आहेत.

पाँटिंगपासून स्मिथपर्यंत अनेकदा भिडले खेळाडू

इथेही ऑस्ट्रेलिया ही मालिका जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते, कारण प्रत्येक खेळाडूने ही मालिका अॅशेसपेक्षा मोठी असल्याचे सांगितले आहे. तसेच ऑस्ट्रेलियाने जवळपास दोन दशके भारतात येऊन एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. मागील तीन बॉर्डर गावस्कर ट्रॉफीही टीम इंडियाच्या नावावर आहेत. 2008 ची कसोटी मालिका सर्वांना आठवत आहे, जेव्हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेत मंकीगेट प्रकरण झालं होतं. त्यावेळी अँड्र्यू सायमंड्सने हरभजन सिंगवर गंभीर आरोप केले होते, त्यानंतर हे प्रकरण चौकशीपर्यंत गेले होते. याच सामन्यात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग मैदानावरच अंपायरसारखे वागत होता आणि आऊटबाबतही वाद झाला होता.

मायकेल क्लार्कने सौरव गांगुलीचा झेल पकडला, तेव्हा रिकी पाँटिंगने आऊटचा इशारा दिला आणि त्यानंतर त्याला आऊट देण्यात आले आणि यावरून बराच वाद झाला. रिकी पाँटिंग हा असा कर्णधार असल्याचं म्हटलं जात होतं, जो विजयासाठी प्रत्येक युक्तीचा अवलंब करायला तयार होता.

जुन्या ऑस्ट्रेलियन संघाची गोष्ट वेगळी होती, पण सध्याच्या संघात असे अनेक खेळाडू आहेत, जे मैदानावर सतत स्लेजिंग करत आहेत. डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि ऑस्ट्रेलियाच्या संघातील अनेक खेळाडूंचे भारतीय खेळाडूंशी वाद झाले आहेत. 2014 मध्ये ऑस्ट्रेलियात कसोटी सामना सुरू असताना स्टीव्ह स्मिथ आणि विराट कोहली यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर स्टीव्ह स्मिथने गोलंदाजी करणाऱ्या रोहित शर्माबद्दल काही कमेंट्स केल्या, त्यावेळी स्लिपमध्ये उभ्या असलेल्या विराट कोहलीने त्याला प्रत्युत्तर दिले.

Sarfraz Khan धावांचा पाऊस पाडतोय; तरी टीम इंडियात संधी का नाही?

विराट कोहली-अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मालिका खेळण्यासाठी पोहोचली तेव्हाची 2021 सालची मालिकाही प्रत्येकाला आठवत आहे. येथे ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने रविचंद्रन अश्विन, ऋषभ पंत यांना विकेटच्या मागे उभे राहून स्लेजिंग केली होती. हे गाब्बा कसोटीच्या अगदी आधी होते, जिथे टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला हरवून इतिहास रचला होता. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2023 मध्येही चाहत्यांना अशाच मालिकेची प्रतीक्षा आहे, जिथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात क्रिकेटची सर्वात मोठी लढाई होणार आहे.

मागील पाच मालिकेचा निकाल

• 2020/21 – भारत 2-1 ने जिंकला (4 सामने)

• 2018/19 – भारत 2-1 ने जिंकला (4 सामने)

• 2016/17 – भारत 2-1 ने जिंकला (4 सामने)

• 2014/15 – ऑस्ट्रेलिया 2-0 ने जिंकला (4 सामने)

• 2012/13 – भारत 4-0 ने जिंकला (4 सामने)

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.

भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ: पॅट कमिन्स (क), अॅश्टन आगर, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ (व्हीसी), मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन, डेव्हिड वॉर्नर

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा

(कसोटी मालिकेचे वेळापत्रक) :

पहिली कसोटी – 9 ते 13 फेब्रुवारी, नागपूर

दुसरी कसोटी – 17 ते 21 फेब्रुवारी, दिल्ली

तिसरी कसोटी – 1 ते 5 मार्च, धर्मशाला

चौथी कसोटी – 9 ते 13 मार्च, अहमदाबाद

    follow whatsapp