Tokyo Olympics मध्ये पदकविजेत्या खेळाडूंचा BCCI करणार सत्कार, जय शहांची घोषणा

मुंबई तक

• 03:00 AM • 08 Aug 2021

२३ वर्षीय भालाफेकपटू नीरज चोप्राने भारताला टोकियो ऑलिम्पिकच्या शेवटच्या दिवशी गोल्ड मेडल मिळवून देत स्पर्धेची सांगता केली. या गोल्ड मेडलमुळे भारतात सध्या आनंदाचं वातावरण आहे. तब्बल १३ वर्षांनी भारताने ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवल्यामुळे सध्या सर्वच स्तरातून नीरज चोप्रावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. बीसीसीआयनेही टोकियोत पदक जिंकणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्याचं ठरवलंय. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी […]

Mumbaitak
follow google news

२३ वर्षीय भालाफेकपटू नीरज चोप्राने भारताला टोकियो ऑलिम्पिकच्या शेवटच्या दिवशी गोल्ड मेडल मिळवून देत स्पर्धेची सांगता केली. या गोल्ड मेडलमुळे भारतात सध्या आनंदाचं वातावरण आहे. तब्बल १३ वर्षांनी भारताने ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवल्यामुळे सध्या सर्वच स्तरातून नीरज चोप्रावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. बीसीसीआयनेही टोकियोत पदक जिंकणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्याचं ठरवलंय.

हे वाचलं का?

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी केलेल्या घोषणेनुसार, सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राला १ कोटी, रौप्यपदक विजेत्या मीराबाई चानू आणि रवी कुमारला प्रत्येकी ५० लाख तर कांस्य पदक विजेत्या पी.व्ही.सिंधू, लोवलिना बोर्गोहेन, बजरंग पुनिया यांना प्रत्येकी २५ लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. तसेच ४१ वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये पदकाची कमाई करणाऱ्या भारतीय हॉकी संघालाही बीसीसीआयने १ कोटी २५ लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे.

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी नीरजचा सामना पाहताना लठ गाड़ दिया छोरे ने असं म्हणत त्याचं कौतुक केलंय. हरियाणा सरकारने या कामगिरीसाठी नीरज चोप्राला सहा कोटींचं बक्षीस आणि सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली आहे. तसेच याचसोबत नीरज चोप्राला सरावासाठी पंचकुला येथे सवलतीच्या दरात जागा देण्याची तयारीही हरियाणा सरकारने दाखवली आहे.

१ सुवर्ण, २ रौप्य आणि ४ कांस्य पदक अशा ७ पदकांसह ऑलिम्पिकतमधली भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी मानवली जात आहे. नीरजने ८७.५८ मी. लांब भाला फेकत सुवर्णपदकावर नाव कोरलं.

लठ गाड़ दिया छोरे ! Tokyo Olympics गाजवणाऱ्या नीरज चोप्रावर शुभेच्छांचा वर्षाव

    follow whatsapp