IND vs BAN: ‘भारताला हरवा, पूर्ण टीमसोबत…’, पाकिस्तानी अभिनेत्रीने ‘या’ संघाला काय दिली ऑफर?

रोहिणी ठोंबरे

19 Oct 2023 (अपडेटेड: 19 Oct 2023, 09:13 AM)

पाकिस्तानी अभिनेत्री सेहेर शिनवारीने भारताचा पराभव पाहण्यासाठी एक विचित्र अट घातली आहे. सेहेरने ट्विटमध्ये म्हटले आहे की, जर बांगलादेश संघाने भारताला हरवले तर ती ढाका येथे जाऊन बांगलादेशी संघाच्या खेळाडूंसोबत डिनर डेटवर जाईन.

Before IND vs BAN match Pakistani actress Sehar Shinwari offered dinner date to Bangladeshi team if they beat India

Before IND vs BAN match Pakistani actress Sehar Shinwari offered dinner date to Bangladeshi team if they beat India

follow google news

World Cup 2023 : भारताविरूद्धच्या वनडे वर्ल्ड कप 2023 (ODI 2023) सामन्यात पाकिस्तानला दुसऱ्यांदा पराभव स्वीकारावा लागला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडियाने (Team India) पाकिस्तानचा 7 विकेटने पराभव केला होता. या पराभवानंतर अभिनेत्री सेहेर शिनवारीसह पाकिस्तानी बरेच निराश झाले. आता भारतीय संघाला हरवण्यासाठी पाकिस्तानी अभिनेत्रीने बांगलादेशी खेळाडूंना मोठी ऑफर दिली आहे. (Before IND vs BAN match Pakistani actress Sehar Shinwari offered dinner date to Bangladeshi team if they beat India)

हे वाचलं का?

पाकिस्तानी अभिनेत्री सेहेर शिनवारीने भारताचा पराभव पाहण्यासाठी एक विचित्र अट घातली आहे. सेहेरने ट्विटमध्ये म्हटले आहे की, जर बांगलादेश संघाने भारताला हरवले तर ती ढाका येथे जाऊन बांगलादेशी संघाच्या खेळाडूंसोबत डिनर डेटवर जाईन.

वाचा : Lalit Patil: ललितच्या महिला मैत्रिणी अन्… नवा ट्विस्ट; ‘त्या’ 2 महिला नेमक्या कोण?

सेहेरला पाकिस्तानच्या पराभवाचा बदला घ्यायचा आहे

सेहेरच्या या ट्विटमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. सेहेर शिनवारी म्हणाली, “इंशाअल्लाह माझे बंगाली बांधव पुढच्या सामन्यात आमचा बदला घेतील. जर त्यांच्या संघाने भारताला हरवले तर मी ढाक्याला जाईन आणि बांगलादेश संघाच्या खेळाडूंसोबत फिश डिनर डेट करीन.”

सेहेरचे हे ट्विट अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारताने पाकिस्तान संघाला दिलेल्या लाजिरवाण्या पराभवाबद्दल आहे. त्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला होता. पाकिस्तानचा संघ 191 धावांवर ऑलआऊट झाला.

वाचा : ‘तुम्ही बेजबाबदार वक्तव्य का करता?’, पॅलेस्टाईनच्या वक्तव्यावरून शरद पवार-भाजपचे युद्ध

 यूजर्सनी पाकिस्तानी अभिनेत्रीची घेतली मजा!

सेहेर शिनवारीला बांगलादेशच्या विजयाबद्दल इतका आत्मविश्वास आहे की तिने आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘मित्रांनो, बांगलादेश संघ भारताला हरवणार आहे. माझ्या या ट्विटचा स्क्रीनशॉट घ्या आणि सामना संपल्यानंतर मला दाखवा.’

वाचा : Manoj Jarange Patil: ‘राजकारण्यांचे डाव उधळून लावले’, जरांगे पाटलांनी नेमकं ते सांगितलं

सेहेरच्या या गोष्टींनी सोशल मीडिया यूजर्सचे लक्ष वेधून घेतले आहे. अनेक युजर्सनी सेहेरला चांगलंच सुनावलं आहे. एका यूजरने कमेंट करत लिहिलं की, ‘तुम्ही भारतात या, तुमची बहीण सीमा हैदरही येथे आहे आणि तुम्हाला येथे सर्व काही मिळेल.’

    follow whatsapp