Video : म्हातारा झालायस तू ! सराव सामन्यात जेव्हा बाबर आझम आपल्याच सहकाऱ्याची खिल्ली उडवतो

मुंबई तक

• 03:22 PM • 20 Oct 2021

आयपीएलचा चौदावा हंगाम संपुष्टात आल्यानंतर युएईत सध्या टी-२० विश्वचषकाचे सराव सामने सुरु आहेत. २४ तारखेला भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये महत्वाचा सामना रंगणार आहे. पाकिस्तानने आपल्या पहिल्या सराव सामन्यात वेस्ट इंडिजवर मात करत चांगली सुरुवात केली. पाकिस्तानने हा सामना ७ विकेट राखून जिंकला, या सामन्यादरम्यान बाबर आझम शादाब खान यांच्यात मिश्कील वाद रंगला. […]

Mumbaitak
follow google news

आयपीएलचा चौदावा हंगाम संपुष्टात आल्यानंतर युएईत सध्या टी-२० विश्वचषकाचे सराव सामने सुरु आहेत. २४ तारखेला भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये महत्वाचा सामना रंगणार आहे. पाकिस्तानने आपल्या पहिल्या सराव सामन्यात वेस्ट इंडिजवर मात करत चांगली सुरुवात केली.

हे वाचलं का?

पाकिस्तानने हा सामना ७ विकेट राखून जिंकला, या सामन्यादरम्यान बाबर आझम शादाब खान यांच्यात मिश्कील वाद रंगला. शाहीन आफ्रिदीच्या पहिल्या षटकात दुसऱ्या बॉलवर लेंडल सिमन्सने एक चोरटी धाव काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी अँड्रे फ्लेचरला रनआऊट करण्याची संधी शादाब खानकडे होती. परंतू शादाबने ही संधी गमावली आणि फ्लेचरने रन पूर्ण केला.

हे पाहिल्यानंतर बाबर आझमने आपल्याच साथीदाराची खिल्ली उडवत त्याला, तू आता म्हातारा झालायस, तरुण असतास तर आता विकेट गेली असती अशी खिल्ली उडवली आहे. पाहा व्हिडीओ…

दरम्यान या सामन्यात बाबर आझमने बॅटींगमध्ये महत्वपूर्ण इनिंग खेळली. ४१ बॉलमध्ये ५० रन्सची इनिंग खेळत बाबर आझमने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. २४ तारखेला बाबर आझमच्या पाकिस्तानी संघाचा सामना विराट कोहलीच्या भारतीय संघासोबत होईल. त्यामुळे या हायवोल्टेज सामन्यात कोणता संघ बाजी मारले हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp