Champions Trophy 2025 : ICC पाकिस्तानला देणार झटका? टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार

मुंबई तक

18 Jul 2024 (अपडेटेड: 18 Jul 2024, 06:47 PM)

Champions Trophy 2025 : आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी संदर्भात कोलंबोत दोन दिवसीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डही हजर असणार आहे. त्यामुळे बैठकीत टीम इंडियाच्या पाकिस्तानात न खेळण्याच्या मुद्यावरून मोठा राडा होण्याची शक्यता आहे.

champions trophy 2025 icc meeting in colombo bcci jay shah attend bcci vs pcb team india

आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी संदर्भात कोलंबोत दोन दिवसीय बैठक बोलावली आहे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

ICC ने बोलावली कोलंबोत दोन दिवसीय बैठक

point

बीसीसीआयचे सचिव जय शाह कोलंबोला होणार रवाना

point

टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार?

Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमानपद पाकिस्तानला देण्यात आले आहे. त्यामुळे ही संपूर्ण स्पर्धा पाकिस्तानात होणार आहे. या स्पर्धेला टीम इंडिया (Team India) जाणार नाही? अशी सुत्रांची माहिती आहे. बीसीसीआयनेही याबाबत अद्याप अधिकृत भूमिका मांडली नाही आहे. पण आता यावर अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे. कारण कोलंबोत (colombo) एक बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय होणार आहे. (champions trophy 2025 icc meeting in colombo bcci jay shah attend bcci vs pcb team india)  

हे वाचलं का?

आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी संदर्भात कोलंबोत दोन दिवसीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डही हजर असणार आहे. त्यामुळे बैठकीत टीम इंडियाच्या पाकिस्तानात न खेळण्याच्या मुद्यावरून मोठा राडा होण्याची शक्यता आहे. 

हे ही वाचा : Aanvi Kamdar Death: Video शूट करता-करताच गेला मुंबईच्या तरुणीचा जीव, तिथे गेली अन्...

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बीसीसीआयचे सचिव जय शाह गुरुवारी बैठकीसाठी कोलंबोला रवाना होणार आहेत. बैठकीच्या अजेंड्यामध्ये या विषयावर कोणत्याही चर्चेचा उल्लेख नसला तरी, हा वादग्रस्त मुद्दा भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशाच्या बोर्डांद्वारे  श्रेणीत घेतला जाऊ शकतो.

पाकिस्तानच्या ड्राफ्ट शेड्यूलनुसार सामने 

पाकिस्तानचे प्रतिनिधित्व पीसीबीचे प्रमुख मोहसिन नक्वी करणार आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान रंगणार आहे. पीसीबीच्या प्रस्तावित वेळापत्रकानुसार, भारताला लाहोरमध्ये तिन्ही साखळी सामने (20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध, 23 फेब्रुवारीला न्यूझीलंडविरुद्ध आणि 1 मार्चला पाकिस्तानविरुद्ध) खेळायचे आहेत. उपांत्य फेरीचे सामने 5 आणि 6 मार्च रोजी कराची आणि रावळपिंडी येथे होणार आहेत, तर अंतिम सामना 9 मार्च रोजी लाहोरमध्ये खेळवला जाणार आहे.

हे ही वाचा : Pooja Khedkar Mother: घरगुती लॉजिंगमध्ये लपलेली मनोरमा खेडकर, अटकेची Inside Story

हायब्रिड मॉडेलवर स्पर्धा खेळवणार? 

टीम इंडियाने जर पाकिस्तानात जाऊन ही स्पर्धा खेळण्यास नकार दिला तर आयसीसी हायब्रीड मॉडेलवर ही स्पर्धा खेळवण्याचा विचार करू शकते. अशा परिस्थितीती भारताचे सामना युएई किंवा श्रीलंकेत खेळवले जाण्याची शक्यता आहे. पण याबाबत अद्याप अंतिम निर्णय झाला नाही आहे. कोलंबोत होणाऱ्या बैठकीत याबाबतचा निर्णय अपेक्षित आहे. जर आयसीसीने हायब्रीड मॉडेलद्वारे सामने खेळण्यास हिरवा कंदील दिला, तर पाकिस्तानला मोठा झटका बसणार आहे. त्यामुळे भारत चॅम्पियन्स ट्रॉफीचा भाग असणार आहे. त्यामुळे या बैठकीत काय तोडगा निघतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

    follow whatsapp