Cheteshwar Pujara : ज्या संघासाठी जीव तोडून खेळला, त्यांनीच दाखवला बाहेरचा रस्ता

मुंबई तक

22 Aug 2024 (अपडेटेड: 22 Aug 2024, 11:09 PM)

Cheteshwar pujara News : चेतेश्वर पुजारा पुजाराने गेल्या वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) मध्ये भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्या अंतिम सामन्यात पुजाराला 41 धावा करता आल्या होत्या. यानंतर पुजाराला कसोटी संघातून वगळण्यात आले होते.

cheteshwar pujara releases from sussex team for next year county championship team india

ससेक्ससोबतचा त्याचा करार आता संपला आहे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

पुजारा टीम इंडियातून सध्या बाहेर आहे.

point

काऊंटी क्रिकेट ससेक्स संघातून खेळायचा.

point

ता ससेक्ससोबतचा त्याचा करार आता संपला आहे

Cheteshwar pujara releases from sussex team : स्टार क्रिकेटर चेतेश्वर पुजारा गेल्या अनेक महिन्यापासून टीम इंडियातून (Team India) बाहेर आहे. पण तरीही काऊंटी क्रिकेट चॅम्पियनशिपसाठी तो ससेक्स संघातून (sussex team) खेळायचा. मात्र आता ससेक्ससोबतचा त्याचा करार आता संपला आहे. त्यामुळे आता पुजारा पुढील हंगामात काउंटी चॅम्पियनीशपमध्ये (county championship)ससेक्सकडून खेळताना दिसणार नाही. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना हा मोठा धक्का बसला आहे. (cheteshwar pujara releases from sussex team for next year championship team india) 

हे वाचलं का?

चेतेश्वर पुजारा पुजाराने गेल्या वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) मध्ये भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्या अंतिम सामन्यात पुजाराला 41 धावा करता आल्या होत्या. यानंतर पुजाराला कसोटी संघातून वगळण्यात आले.  त्यानंतर आता पुजारा पुढील हंगामात काउंटी चॅम्पियनीशपमध्ये ससेक्सकडून खेळताना दिसणार नाही. कारण इंग्लिश क्लबने ऑस्ट्रेलियाच्या डॅनियल ह्युजेसची सेवा कायम ठेवण्यासाठी त्याला सोडण्याचा पर्याय निवडला आहे. डावखुरा फलंदाज ह्यूज पुढील हंगामातील सर्व चॅम्पियनशिप आणि T20 व्हिटॅलिटी ब्लास्ट सामन्यांसाठी उपलब्ध असेल.

हे ही वाचा : Badlapur News: '...तर ते सुद्धा विकृत आहेत', बदलापूर घटनेवरून ठाकरेंची CM शिंदेंवर जहरी टीका

चॅम्पियनशिपच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज जेडेन सील्स या काऊंटी संघाकडून खेळणार असल्याचेही क्लबने जाहीर केले.  यंदाच्या ब्लास्टच्या गट टप्प्यात ह्युजेसने 43.07 च्या सरासरीने 560 धावा केल्या, ज्यात 5 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या 96 धावांची होती. तो चालू हंगामातील काउंटी चॅम्पियनशिपमधील उर्वरित 5 सामने खेळण्यासाठी उपलब्ध असेल.

पुजारा 2024 मध्ये सलग तिसऱ्यांदा ससेक्सकडून खेळला. ह्यूज परत येण्यापूर्वी त्याने पहिले 7 चॅम्पियनशिप सामने खेळले होते.प्रथम श्रेणी क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर पुजाराने 2022-2024 दरम्यान 34 डावांमध्ये 74.80 च्या सरासरीने 2244 धावा केल्या, ज्यात 10 शतके आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे.

''चेतेश्वरला करारबद्ध करणे सोपे काम नव्हते, परंतु डॅनियल आमच्या गरजेनुसार फिट बसतो आणि आम्हाला आनंद होत आहे की तो उर्वरित हंगामासाठी उपलब्ध असेल,'', असे ससेक्सचे मुख्य प्रशिक्षक पॉल फारब्रेस यांनी अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

कसोटी कारकीर्द

36 वर्षीय चेतेश्वर पुजाराची कसोटी कारकीर्द चमकदार आहे. पुजाराने आतापर्यंत 103 कसोटी सामन्यांमध्ये 43.60 च्या सरासरीने 7195 धावा केल्या आहेत. या काळात त्याच्या बॅटमधून 19 शतके आणि 35 अर्धशतके झाली. पुजाराने भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना गतवर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये खेळला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्या अंतिम सामन्यात पुजाराला 41 धावा करता आल्या होत्या. यानंतर पुजाराला कसोटी संघातून वगळण्यात आले होते.

    follow whatsapp