Indian faster Bowler Ishant Sharma : भारताचा उत्तम वेगवान गोलंदाज (Faster Bowlers ) म्हणून इशांत शर्माची (Ishant Sharma) गणना केली जाते. विशेषतः कसोटी (Test Cricket Match) क्रिकेटमध्ये. आत्तापर्यंत, कपिल देव (Kapil Dev) व्यतिरिक्त, कोणत्याही भारतीय वेगवान गोलंदाजाने कसोटीत जास्त विकेट घेतलेल्या नाहीत. कपिल देव यांनी 131 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 434 विकेट घेतल्या आहेत. तर इशांतने 105 कसोटीत 311 विकेट घेतल्या आहेत. 2007 साली आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या इशांत शर्माने पाकिस्तानविरुद्ध (Against Pakistan) कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. इशांतने स्वत:चे नाव कमावले. पण एक वेळ अशी आली की त्याची कारकीर्द संपणार असे वाटत होते. ishant Sharma share his lifes bad memories
ADVERTISEMENT
Gujrat : सहकाऱ्यांनी पाणी दिलं अन् नंतर… क्रिकेट खेळताना तरुणाचा मृत्यू
एका ओव्हरमध्ये दिल्या 30 धावा
2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात इशांतने एकाच ओव्हरमध्ये 30 धावा दिल्या होत्या. जेम्स फॉकनरने आपल्या एकाच ओव्हरमध्ये 4 षटकार आणि 1 चौकार लगावला होता. इशांतने सांगितले की, मॅचनंतर मी महिनाभर रडत होतो. यासह तो म्हणाला एमएस धोनी आणि शिखर धवन माझ्या पाठीशी उभे राहिले.
महिनाभर रडलो : इशांत
क्रिकबझशी खास बातचीत करताना इशांत शर्मा म्हणाला की, 2013 साली माझ्या कारकिर्दीतील सर्वात वाईट क्षण मोहालीच्या सामन्यात आला. हा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होता. तो काळ माझ्यासाठी खूप कठीण होता. मी जास्त धावा दिल्या म्हणून नाही. उलट मला वाईट वाटत होतं कारण माझ्यामुळे संघ हरला होता. त्यावेळी मी माझ्या पत्नीला डेट करत होतो. मी तिच्याशी बोललो तेव्हा मी अनेक महिने रडलो. मी तिला रोज फोन करायचो आणि फोनवर रडायचो, असं इशांत म्हणाला.
Shweta Sehrawat : मोठ्या बहिणीमुळे शिकली क्रिकेट, अशी आहे ‘श्वेता’ची कहाणी
इशांत पुढे म्हणाला की, त्या दिवशी धोनी आणि शिखर धवन माझ्या खोलीत आले आणि माझी समजूत घालत होते. इशांत म्हणाला की, त्या एका सामन्यामुळे लोकांच्या मनात हे पक्के झाले होते की मी पांढऱ्या चेंडूचा गोलंदाज नाही. इशांत शर्मा भारताकडून शेवटचा मॅच डिसेंबर 2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. यानंतर तो टीम इंडियातून बाहेर पडला. 2016 मध्ये तो शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. 2013 मध्ये त्याने संघासाठी शेवटचा टी-20 सामना खेळला होता.
ADVERTISEMENT