ADVERTISEMENT
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात गैरहजर दिसला.
यामागचं कारण म्हणजे, रोहित शर्माने त्याचा मेव्हणा कुणाल सजदेहच्या लग्नाला हजेरी लावली होती.
रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका सजदेह यांचे फोटो लग्नातील काही फोटो समोर आले आहेत. दोघंही एकत्र खूप छान दिसत आहेत.
रितिका सजदेहने तिच्या इन्स्टाग्रामवर लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या लग्नात रोहित शर्मानेही जबरदस्त डान्स केला, तो पत्नी रितिकासोबत डान्स करताना दिसला.
रितिका सजदेहचा भाऊ कुणाल सजदेहने अनिशा शाहसोबत लग्न केले आहे. ती एक मेकअप आर्टिस्ट आहे.
या लग्नासाठी रोहित शर्माने पहिल्या वनडेतून सुट्टी घेतली होती. तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या-तिसऱ्या सामन्यात भाग घेणार आहे.
ADVERTISEMENT