मोक्याच्या क्षणी विराट कोहली फेल, टी-२० क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडली अशी घटना

मुंबई तक

• 03:05 PM • 18 Mar 2021

इंग्लंडविरुद्ध चौथ्या टी-२० सामन्यात पुन्हा एकदा विराट कोहलीच्या भारतीय संघाने बॅटींग लाईनअपमध्ये धक्कातंत्र आजमावलं. इंग्लंडने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने दोन बदल करुन इशान किशन आणि चहलच्या जागेवर सूर्यकुमार यादव आणि राहुल चहरला संधी दिली. रोहित शर्मा आणि लोकेश राहुलने चांगली सुरुवात केली. जोफ्रा आर्चरने रोहित शर्माला आऊट केल्यानंतर सूर्यकुमार यादवला […]

Mumbaitak
follow google news

इंग्लंडविरुद्ध चौथ्या टी-२० सामन्यात पुन्हा एकदा विराट कोहलीच्या भारतीय संघाने बॅटींग लाईनअपमध्ये धक्कातंत्र आजमावलं. इंग्लंडने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने दोन बदल करुन इशान किशन आणि चहलच्या जागेवर सूर्यकुमार यादव आणि राहुल चहरला संधी दिली. रोहित शर्मा आणि लोकेश राहुलने चांगली सुरुवात केली. जोफ्रा आर्चरने रोहित शर्माला आऊट केल्यानंतर सूर्यकुमार यादवला तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आली.

हे वाचलं का?

Ind vs Eng : अहमदाबादमध्ये मुंबईचा ‘सूर्य’तळपला, टी-२० क्रिकेटमध्ये पहिली हाफ सेंच्युरी

दरम्यान लोकेश राहुलही चौथ्या सामन्यात फारशी चमकदार कामगिरी करु शकला नाही. बेन स्टोक्सने त्याला १४ रन्सवर आऊट केलं. यानंतर मैदानावर आलेल्या विराट कोहलीकडून भारतीय फॅन्सना खूप आशा होत्या. परंतू आदिल रशिदच्या बॉलिंगवर पुढे येऊन मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात विराट स्टम्पआऊट झाला. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये स्टम्पआऊट होण्याची विराटची ही पहिलीच वेळ ठरली.

गेल्या दोन टी-२० सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करणारा विराट या सामन्यात अपयशी ठरला. अवघी १ रन काढून विराट माघारी परतल्यानंतर सूर्यकुमार यादवने हाफ सेंच्युरी झळकावत ऋषभ पंतच्या साथीने महत्वपूर्ण भागीदारी केली आणि भारतीय संघाचा डाव सावरला. परंतू बॅटींग लाईनअपमध्ये केलेल्या बदलांमुळे टीम इंडिया आणि विराटवर पुन्हा एकदा सोशल मीडियातून टीका होते आहे.

Ind vs Eng : पहिल्याच बॉलवर रोहित शर्माची हाफ सेंच्युरी, भारताची चांगली सुरुवात

    follow whatsapp