Hardik Pandya Rejoining Mumbai Indians : इंडियन प्रिमियर लीगच्या 2024 साठीचा लिलाव येत्या 19 डिसेंबरला दुबईत होणार आहे. या लिलावापुर्वीच एक मोठी डील झाली आहे. गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या पुन्हा मुंबई इंडियन्स संघात सामील होणार आहे. यासाठी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स (gujarat titans) यांच्यात डील सुरू आहे. ही डील यशस्वी झाल्यास हार्दिक पंड्याची (Hardik Pandya) मुंबई इंडियन्समध्ये (mumbai indians) घरवापसी होणार आहे. (gujarat titans captain hardik pandya rejoining mumbai indians ipl 2024 auction)
ADVERTISEMENT
ईएसपीएन क्रिकइंफोने दिलेल्या वृत्तानुसार, गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या पुन्हा मुंबई इंडियन्स संघात सामील होणार आहे. मुंबई इंडियन्स संघाने हार्दिक पंड्याला खरेदी करण्याची तयारी दाखवली आहे. यासाठी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये डील सूरू आहे. मुंबई इंडियन्स संघ हार्दिक पंड्याला 15 कोटीमध्ये खरेदी करणार आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण व्यवहार रोखीने होणार आहे. जर ही डील यशस्वी झाली तर कदाचित हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा करार असेल. दरम्यान दोन्ही फ्रँचायझींनी अद्याप या डीलबाबत कोणतीही माहिती दिली नाही आहे.
हे ही वाचा : ‘2014 पासून देशाच्या पाठीमागे ‘पनौती’…’ ठाकरेंचा सामनातून PM मोदींवर हल्लाबोल
आयपीएल 2023 च्या लिलावानंतर, मुंबई इंडियन्सच्या खात्यात फक्त 0.05 कोटी रुपये (सुमारे $ 6000) शिल्लक होते. फ्रँचायझीला आगामी लिलावासाठी अतिरिक्त 5 कोटी रुपये (सुमारे $600,000) मिळतील. याचा अर्थ एवढाच की मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याचा समावेश करण्यासाठी काही खेळाडूंना रिलीज करणार आहे. दरम्यान रिटेन करण्याची अंतिम मुदत 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता संपणार आहे.
कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली 2022 मध्ये गुजरात टायटन्सने डेब्यु सीझनमध्ये विजेतेपद पटकावले होते. राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्धच्या अंतिम सामन्यात हार्दिक पांड्यालाही ‘प्लेअर ऑफ द मॅच’ही मिळाला होता. दरम्यान 2023 मध्ये गुजरात टायटन्सने दुसऱ्यांदा IPL फायनलमध्ये प्रवेश केला होता. यावेळी चेन्नई सुपरकिंग्जकडून त्यांना पराभव स्विकारावा लागतो. विशेष बाब म्हणजे या दोन्ही हंगामात हार्दिकच्या नेतृत्वाखाली टायटन्स लीग टप्प्यात गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहिली होती.
हे ही वाचा :Gujarat Crime: चप्पल तोंडात घातली, बेल्टने मारलं… बॉस बनली ‘लेडी डॉन’!
गुजरात टायटन्ससाठी हार्दिक पांड्याने 30 डावांमध्ये 41.65 च्या सरासरीने आणि 133.49 च्या स्ट्राइक रेटने 833 धावा केल्या आहेत. त्याने 8.1 च्या इकॉनॉमी रेटने 11 बळीही घेतले. हार्दिक पांड्या सध्या दुखापतग्रस्त असून 2023 च्या क्रिकेट विश्वचषकात तो फक्त चार सामने खेळू शकला आहे.
ADVERTISEMENT