Hardik Pandya Natasa Stankovic Divorce : नताशा- हार्दिक पंड्याचा घटस्फोट,चार वर्षांचा संसार मोडला

मुंबई तक

18 Jul 2024 (अपडेटेड: 18 Jul 2024, 10:35 PM)

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce: बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक आणि टीम इंडियाचा ऑलराऊंडर क्रिकेटर हार्दिक पंड्या घटस्फोट घेणार आहेत. खुद्द क्रिकेटरने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दोघेही विभक्त होणार असल्याच्या बातम्या येत होत्या.

hardik pandya natasha stankovic divorce cricket confirm shared instagram post

हार्दीक पंड्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून माहिती दिला आहे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

हार्दिक-नताशाचा चार वर्षांचा संसार मोडला

point

दोघांनी परस्पर संमतीने घेतला विभक्त होण्याचा निर्णय

point

हार्दिक पंड्याने इस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून दिली माहिती

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce: बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक आणि टीम इंडियाचा ऑलराऊंडर क्रिकेटर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) घटस्फोट घेणार आहेत. हार्दिक पंड्यानेच या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गेल्या 4 वर्षापासून दोघेही नात्यात होते. त्यांना अगस्त्य नावाचा मुलगा देखील आहे. आता दोघांनी परस्पर समितीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. हार्दीक पंड्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून माहिती दिला आहे. (hardik pandya natasha stankovic divorce cricket confirm shared instagram post) 

हे वाचलं का?

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाल्यापासून हार्दिक पंड्या प्रचंड ट्रोल झाला होता.त्यानंतर टी20 वर्ल्ड कप दरम्यान हार्दिक पंड्या यांचा घटस्फोट झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. नताशाने हार्दिकला अनफॉलो केले होते. त्याचसोबत वर्ल्ड कपच्या एकही सामन्यात नताशा हार्दिकला स्टेडिअममध्ये चिअर करताना दिसली नव्हती. त्यामुळे हार्दिकच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु होत्या. मात्र या वृत्ताला दुजोरा मिळत नव्हता. अखेर आज हार्दिकने इस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून विभक्त होणार असल्याची माहिती दिली आहे 

हे ही वाचा : Majhi Ladki Bahin Yojana : 'या' कागदपत्रात मिळाली मोठी सूट, आली नवीन अपडेट

पंड्याची पोस्ट जशीच्या तशी...

हार्दिक पंड्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहले की, गेली चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर नताशा आणि मी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही हे नाते वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. पण आता आम्हा दोघांसाठी हाच योग्य निर्णय आहे असे आम्हाला वाटते. आमच्यासाठी हा खूप कठीण निर्णय होता, एकत्र घालवलेले आनंदाचे क्षण, परस्परांचा आदर आणि एकमेकांचा सहवास, जे काही आम्ही एकत्र घालवले आणि आनंद लुटला, आम्ही एक कुटुंब म्हणून पुढे गेलो, असे हार्दिक पंड्या त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतोय.

 

आपला मुलगा अगस्त्याची काळजी कोण घेणार हे देखील हार्दिकने सांगितले. त्यांनी लिहिले- आमच्या आयुष्यात अगस्त्य असणे यासाठी आम्ही भाग्यवान आहोत, जो नेहमी आमच्या जीवनाचा पाया राहील. आम्ही दोघे मिळून त्याची काळजी घेऊ. त्याला जगातील सर्व सुख मिळावे यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू आणि त्याच्या आनंदासाठी जे काही करता येईल ते करू. आम्हाला आशा आहे की तुमचा पाठिंबा मिळेल आणि या कठीण काळात आमची गोपनीयता समजून घ्या, असे हार्दिक पंड्या म्हणाला आहे. 

हे ही वाचा : Maza Ladka Bhau Yojana Online Apply: असा भरा ऑनलाइन अर्ज, सरकारकडून मिळवा 10 हजार रुपये!

नताशाचा पोस्टमध्ये काय? 

दरम्यान मंगळवारी नताशा सर्बियामध्ये तिच्या माहेरी निघून गेली होती. याची माहिती नताशाने सोशल मीडियावर पोस्ट करून दिली होती. यानंतर नताशा मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली होती. नताशासोबत मुलगा अगस्त्यही दिसला होता. इंस्टाग्रामवर पोस्ट करताना नताशाने लिहिले होते, ही वर्षाची ती वेळ आहे. नताशाच्या या स्टेपने युजर्सना खात्री दिली होती की दोघांमध्ये सर्व काही ठीक नाही. हार्दिकने अखेर अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अटकळांवर मौन सोडले असून घटस्फोटाला पुष्टी दिली आहे.
 
 नताशा ही सर्बियन मॉडेल आहे. 2012 मध्ये ती भारतात आली आणि प्रकाश झा यांच्या सत्याग्रह चित्रपटात आयटम साँग करून तिने पदार्पण केले होते. यानंतर ती बिग बॉस 8 आणि नच बलिए सारख्या रिॲलिटी शोचाही भाग होती. नताशा आणि हार्दिकने 1 जानेवारी 2020 रोजी एका इंटिमेट सेरेमनीमध्ये साखरपूडा केला होता. यानंतर, कोविड काळात 31 मे 2020 रोजी त्यांचे लग्न झाले. या जोडप्याचा मुलगा अगस्त्यचा जन्म 30 जुलै 2020 रोजी झाला. 14 फेब्रुवारी 2023 रोजी नताशा आणि हार्दिकचे दुसरे लग्न झाले होते.
 

    follow whatsapp