अबु धाबीच्या शेख झाएद क्रिकेट स्टेडीअमचे पिच क्युरेटन मोहन सिंग यांचा मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. रविवारी न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याआधी मोहन सिंग यांचा मृतदेह सापडला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन सिंग यांनीच न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याचं पिच बनवलं होतं.
ADVERTISEMENT
मोहन सिंग यांच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मुळचे पंजाबच्या मोहाली येथील असलेले मोहन सिंग हे अनुभवी पिच क्युरेटर मानले जातात. बीसीसीआयचे माजी मुख्य पिच क्युरेटर दलजित सिंग यांच्या नेतृत्वाखाली मोहन सिंह यांनी अनेक वर्ष काम केलं आहे. २००० साली मोहन सिंह युएईला स्थायिक झाले. मोहन सिंग यांच्या मृत्यूचं कारण समजताच दलजित यांनाही धक्का बसला आहे.
T20 World Cup : 2012 नंतर टीम इंडियावर पहिल्यांदाच नामुष्की, नामिबीयाविरुद्धचा सामना फक्त औपचारिकतेचा
आयसीसीनेही मोहन सिंग यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. अबु धाबीच्या क्रिकेट स्टेडीअमवरचा ग्राऊंड स्टाफ आणि मोहन सिंग यांच्या परिवाराची परवानगी घेतल्यानंतर आजच्या सामन्याला सुरुवात करण्यात आली.
T20 World Cup : न्यूझीलंडच्या विजयासोबत टीम इंडियाचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात
२०१२ च्या स्पर्धेनंतर आयसीसीच्या स्पर्धेतून साखळी फेरीतून गाशा गुंडाळावा लागण्याची टीम इंडियाची ही पहिलीच वेळ आहे. न्यूझीलंडव्यतिरीक्त अ गटातून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड तर ब गटात पाकिस्तानने सेमी फायनलची फेरी गाठली आहे. विराट कोहलीचा भारतीय संघ यंदाची स्पर्धा जिंकण्यासाठी प्रमुख दावेदार मानला जात होता.
परंतू स्पर्धेतल्या पहिल्याच दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाला पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून सपाटून पराभव पत्करावा लागला. ज्यामुळे भारताचं स्पर्धेतलं आव्हान धोक्यात आलं. यानंतर टीम इंडियाने अफगाणिस्तान आणि स्कॉटलंडचा धुव्वा उडवत आपली आशा कायम ठेवली. परंतू न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यातले फासे हे टीम इंडियाच्या बाजूने पडले नाहीत आणि भारत स्पर्धेबाहेर फेकला गेला.
ADVERTISEMENT