यंदाच्या टी-२० विश्वचषकाबद्दल आयसीसीने अखेरीस निर्णय घेतला आहे. १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा यंदा युएई आणि ओमानमध्ये खेळवली जाणार आहे. आयसीसीने यावर शिक्कामोर्तब केलं आहे. या स्पर्धेचं आयोजन हे भारताबाहेर होणार असलं तरीही स्पर्धेच्या आयोजनाचे हक्क हे बीसीसीआयकडेच राहणार आहेत.
ADVERTISEMENT
“सध्या उपलब्ध करुन दिलेल्या वेळेत टी-२० विश्वचषक स्पर्धा पूर्णपणे आणि सुरक्षेचे सर्व नियम आखून पार पाडणं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे.” ICC चे हंगामी सीईओ जॉफ अल्ड्राईस यांनी माहिती दिली. यंदाची स्पर्धा भारताबाहेर आयोजित करण्याचा आमचा प्रयत्न होता. परंतू सध्याची परिस्थिती पाहता जो देश बायो सिक्युअर बबल तयार करुन Multy Nation स्पर्धा आयोजित करु शकत असेल अशाच देशांमध्ये पुढे स्पर्धेचं आयोजन केलं जाईल या विचारावर आम्ही आलो आहोत.
WTC Schedule : आगामी स्पर्धेसाठी Team India समोर कोणाचं आव्हान? जाणून घ्या वेळापत्रक…
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनेही यंदाची स्पर्धा भारतात आयोजित करण्याचे आमचे प्रयत्न होते. परंतू कोरोनामुळे देशात निर्माण झालेलं संभ्रमाचं वातावरण पाहता आम्ही ही स्पर्धा युएई आणि ओमानमध्ये आयोजित करत आहोत असं सांगितलं. या स्पर्धेसाठी ४ ठिकाणं निश्चीत करण्यात आली आहेत.
१) दुबई इंटरनॅशनल स्टेडीअम
२) शेख झायेद स्टेडीअम, अबुधाबी
३) शारजाह स्टेडीअम
४) ओमान क्रिकेट अकॅडमी ग्राऊंड
स्पर्धेचा पहिला टप्पा हा ८ देशांच्या पात्रता फेरीपासून सुरुवात होईल. ओमान आणि युएई अशा दोन ठिकाणी ही पात्रता फेरी खेळवली जाईल. या पात्रता फेरीतील ४ संघ हे सुपर ८ संघासोबत पात्र ठरतील. पात्रता फेरीत खेळणाऱ्या संघाची नावं –
बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड, स्कॉटलँड, नामिबिया, ओमान, पापुआ न्यू गिनी
BLOG : प्रश्न इतकाच की BCCI ती हिंमत दाखवणार का?
ADVERTISEMENT