ADVERTISEMENT
वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 10 गडी राखून पराभव केला.
प्रथम फलंदाजी करताना भारताने 117 धावाच केल्या; हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 11 षटकात पूर्ण केले.
टीम इंडियाच्या पराभवानंतर फलंदाजांवर टीका होत आहे. सूर्यकुमार यादवही सर्वांच्या निशाण्यावर आहे.
माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी सूर्यकुमार यादवच्या खेळीवर प्रश्न उपस्थित केले.
‘सूर्यकुमार यादव फक्त T20 सामन्यासाठीच योग्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.’
गावस्कर पुढे म्हणाले, ‘सूर्याचे स्टांस खुले राहतात. टी20 नुसार ते चांगले आहे, पण वनडेसाठी नाही.’
‘सूर्यकुमार यादवने फलंदाजी प्रशिक्षकासोबत थोडा वेळ घालवला पाहिजे’, असे सुनील गावस्कर म्हणाले.
सध्या सूर्यकुमार यादव सतत फ्लॉप होत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन्ही वनडेमध्ये पहिल्याच चेंडूवर तो बाद झाला.
ADVERTISEMENT