Ind vs Eng : पहिल्याच बॉलवर रोहित शर्माची हाफ सेंच्युरी, भारताची चांगली सुरुवात

मुंबई तक

• 01:55 PM • 18 Mar 2021

इंग्लंडविरुद्ध चौथ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने दणक्यात सुरुवात केली आहे. तिसरा सामना गमावल्यानंतर भारतीय संघ मालिकेत १-२ ने पिछाडीवर पडला आहे. चौथ्या टी-२० साठी भारतीय संघात महत्वाचे बदल करण्यात आले असून इशान किशन आणि युजवेंद्र चहलच्या जागेवर सूर्यकुमार यादव आणि राहुल चहरला संघात स्थान देण्यात आलं आहे. इंग्लंडचा कॅप्टन ओएन मॉर्गनने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग […]

Mumbaitak
follow google news

इंग्लंडविरुद्ध चौथ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने दणक्यात सुरुवात केली आहे. तिसरा सामना गमावल्यानंतर भारतीय संघ मालिकेत १-२ ने पिछाडीवर पडला आहे. चौथ्या टी-२० साठी भारतीय संघात महत्वाचे बदल करण्यात आले असून इशान किशन आणि युजवेंद्र चहलच्या जागेवर सूर्यकुमार यादव आणि राहुल चहरला संघात स्थान देण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

इंग्लंडचा कॅप्टन ओएन मॉर्गनने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. लोकेश राहुलसोबत ओपनिंगला आलेल्या रोहित शर्माने आदिल रशिदच्या पहिल्याच बॉलवर खणखणीत सिक्स लगावत आगळंवेगळं अर्धशतक साजरं केलं. भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स मारणाऱ्या बॅट्समनच्या यादीत रोहित आता पहिल्या स्थानावर आहे. दरम्यान आक्रमक सुरुवात केल्यानंतरही रोहित या मॅचमध्ये फारशी चमक दाखवू शकला नाही. अवघ्या १२ रन्स करुन जोफ्रा आर्चरच्या बॉलिंगवर रोहित कॅचआऊट झाला.

इंग्लंडविरुद्ध टेस्ट सिरीज जिंकल्यानंतर टी-२० सिरीजमध्ये टीम इंडियाची सिलेक्शन पॉलिसी चर्चेत राहिलेली आहे. पहिल्या ३ मॅचमध्ये टीम इंडियाचा ओपनर लोकेश राहुलने खराब कामगिरी केली होती. त्यातच पहिल्या दोन सामन्यांसाठी रोहित शर्माला विराटने विश्रांती दिल्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता. वर्षाअखेरीस भारतात टी-२० वर्ल्डकपच आयोजन होणार आहे. या पार्श्वभुमीवर टीम इंडियासाठी इंग्लंडविरुद्धची सिरीज महत्वाची मानली जातेय.

    follow whatsapp