SA vs IND : कॅप्टन्सीची जबाबदारी गेली, पहिल्याच सामन्यात विराटने मोडला सचिनचा विक्रम

मुंबई तक

• 03:15 PM • 19 Jan 2022

कसोटी मालिका गमावल्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वन-डे मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. कर्णधारपदावरुन हटवण्यात आल्यानंतर पहिल्याच सामन्यात विराट कोहलीने आश्वासक खेळ करत अर्धशतकी खेळी केली. या खेळीदरम्यान विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. परदेशात खेळत असताना वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीने आता पहिलं स्थान मिळवलं आहे. आजच्या […]

Mumbaitak
follow google news

कसोटी मालिका गमावल्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वन-डे मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. कर्णधारपदावरुन हटवण्यात आल्यानंतर पहिल्याच सामन्यात विराट कोहलीने आश्वासक खेळ करत अर्धशतकी खेळी केली. या खेळीदरम्यान विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे.

हे वाचलं का?

परदेशात खेळत असताना वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीने आता पहिलं स्थान मिळवलं आहे. आजच्या खेळीदरम्यान नववी धाव काढून त्याने हा विक्रम केला.

सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत परदेशात खेळत असताना १४७ सामन्यांमध्ये ५०६५ धावा केल्या होत्या. विराट कोहलीने सचिनचा हा विक्रम अवघ्या १०८ सामन्यांमध्येच मोडला आहे.

परदेशात वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणारे भारतीय फलंदाज –

१) विराट कोहली – ५ हजार १०१ धावा* (१०८ सामने)

२) सचिन तेंडुलकर – ५ हजार ६५ धावा (१४७ सामने)

३) महेंद्रसिंह धोनी – ४ हजार ५२० धावा (१४५ सामने)

४) राहुल द्रविड – ३ हजार ९९८ धावा (११७ सामने)

५) सौरव गांगुली – ३ हजार ४६८ धावा (१०० सामने)

परदेशात खेळताना विराट कोहलीने आतापर्यंत चांगली कामगिरी करुन दाखवली आहे. विराटने परदेशात खेळताना ५८ च्या सरासरीने धावा केल्या असून यात २० शतकांचा समावेश आहे. परदेशात खेळत असताना वन-डे क्रिकेटमध्ये सचिनच्या नावावर १२ शतकांची नोंद आहेत. गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली खराब फॉर्ममुळे चर्चेत असलेल्या कोहलीसाठी ही खेळी खूप फायदेशीर ठरु शकते. ६३ बॉलमध्ये ३ चौकार लगावत विराट ५१ धावा काढून शम्सीच्या बॉलिंगवर आऊट झाला.

    follow whatsapp