भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील दुसरा टी-२० सामना रविवार, १२ जून रोजी कटक येथील बाराबती स्टेडियमवर होणार आहे. दुसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी गुरुवारी बाराबती स्टेडियमबाहेर तिकीट विक्रीवरून मोठा गोंधळ झाला. रांगेत उभ्या असलेल्या काही महिलांनी एकमेकांशी भांडायला सुरूवात केली. ही भांडणं एवढी टोकाला गेली की पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करावा लागला.
ADVERTISEMENT
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, काही महिला अचानक रांगेत तिकीट काढण्यासाठी पुढे घुसल्या. त्यामुळे तिकीट विक्रीवरून मोठा गदारोळ झाला, त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. 2019 नंतर ओडिशामध्ये आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जात आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. तिकीट विक्रीच्या वेळी चाहत्यांमध्ये एकढा उत्साह होता की कडक उन्हात तासनतास रांगेत उभे राहण्याची त्यांची तयारी होती. अखेर त्याचा संयम सुटला.
अतिरिक्त जिल्हा पोलिस आयुक्त प्रमोद रथ यांनी सांगितले की, बाराबती स्टेडियममध्ये सुमारे 40,000 लोक तिकीट खरेदी करण्यासाठी काउंटरवर होते, तर केवळ 12,000 तिकीट उपलब्ध होते. तिकीट विक्रीची प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी पोलिसांना या वेळी सौम्य पोलीस बळाचा वापर करावा लागला आहे.
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर टीम इंडियाने पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सात विकेटने गमावला आहे. दक्षिण आफ्रिकेने 212 धावांचे लक्ष्य 19.1 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. डेव्हिड मिलरने 64 आणि रस्सी व्हॅन डर डुसेनने 75 धावा केल्या. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 131 धावांची भागीदारी केली. इशान किशनने 76 धावांची खेळी करत भारताला मोठी धावसंख्या उभी करण्यासाठी मदत झाली.
ADVERTISEMENT