IND vs SL 1st ODI
ADVERTISEMENT
गुवाहटी : रनमशीन विराट कोहलीची शानदार शतकी खेळी आणि युवा वेगवान गोलंदाद उम्रान मलिकच्या ३ विकेट्सच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजयाची नोंद केली. तसंच ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडीही घेतली.
सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकून श्रीलंकेनं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यास पाचारण केल्यानंतर भारताने दमदार सुरूवात केली. सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिलने नाबाद १४३ धावांची भागिदारी रचली. शुभमन गिल बाद झाल्यानंतर रोहितही ८३ धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ श्रेयस अय्यरही स्वस्तात माघारी फिरला.
त्यानंतर आलेल्या विराट कोहलीने शानदार शतकी खेळी केली. विराट कोहली आणि केएल राहुल यांनी चौथ्या विकेटसाठी ९० धावांची भागिदारी केली. विराट आणि के.एल.राहुल बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेलही चमकु शकले नाहीत. अखेरीस ५० षटकांमध्ये भारताने ७ गड्यांच्या मोबदल्यात दिलेल्या ३७३ धावांचा डोंगर उभा केला.
भारताच्या ३७४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायला मैदान उतरलेल्या श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. मोहम्मद सिराजने पहिल्या ५ षटकातच श्रीलंकेला २ धक्के दिले. सिराजनंतर उमरान मलिकने देखील श्रीलंकेला ३ धक्के दिले. उमरानने लंकेची अवस्था ७ बाद १७९ अशी केली होती. मात्र श्रीलंकेच्या कर्णधाराने पुन्हा एकाकी झुंज दिली. कर्णधार दसुन शनाकाने शतकी खेळी करत श्रीलंकेला मोठ्या पराभवापासून वाचवलं.
श्रीलंकेकडून सलामीवीर पथुम निसाकाने ७२ धावा केल्या. तर धनंजय डिसिल्वाने ४७ धावा केल्या. या तिघांशिवाय इतर फलंदाज फारशी चमक दाखवू शकले नाही. भारतासाठी उम्रान मलिकने सर्वाधिक तीन गडी बाद केले. तर मोहम्मद सिराजने दोन, मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. अखेरीस भारताने सामना ६७ धावांनी जिंकला.
ADVERTISEMENT