टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज विरूद्धचा दुसरा टेस्ट सामना पोर्ट ऑफ स्पेनमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडिया पहिल्या डावात 438 धावांवर ऑल आऊट झाली होती.टीम इंडियाकडून विराट कोहलीने शतक ठोकले होते. त्याचे हे शतक पाहण्यासाठी वेस्ट इंडिजची एक विशेष पाहूणी मैदानात उपस्थित होती. या विशेष पाहूणीने दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या समाप्तीनंतर विराट कोहलीची भेट घेतली होती. या भेटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ADVERTISEMENT
टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी विराट कोहलीने खणखणीत शतक ठोकले होते. टेस्टच्या 500 व्या सामन्यात आलेले त्याचे हे 76 वे शतक होते. हे शतक पाहण्यासाठी वेस्ट इंडिजचा विकेटकिपर जोशूआ दा सिल्वा याची आई मैदानात उपस्थित होती. तिने या शतकाचा स्टेडिअमध्ये जल्लोष केला होता. यानंतर दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या समाप्तीनंतर टीम इंडियाचे खेळाडू बसने हॉटेलमध्य़े जात असताना जोशूआच्या आईने विराटची भेट घेतली होती. या संदर्भातला व्हिडिओ व्हायरल होत आहे.
व्हिडिओत जोशूआ दा सिल्वाच्या आईने विराट कोहलीला पाहताच त्याला मिठी मारली आणि त्याच्या गालावर किस केले आहे. तसेच जोशूआची आई विराट कोहलीसोबत काही मिनिटे गप्पा देखील मारताना दिसली आहे. या सर्व प्रकरणाने ती भारावून गेल्याचे व्हिडिओत दिसत आहे. या भेटीचा व्हिडिओ विराटच्या एका फॅनने ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओची आता चर्चा आहे.
विशेष म्हणजे टेस्ट सामन्याच्या पहिल्याच दिवशी जोशूआ दा सिल्वा आणि विराट कोहलीचे एक संभाषण माईकमध्ये रेकॉर्ड झाले होते. या संभाषणात जोशूआने विराट कोहलीला त्याची आई हा सामना पाहायला येत असल्याची माहिती दिली होती. या सामन्यानंतर विराट कोहलीने जोशूआकडे पाहत हसून आश्चर्य व्यक्त केले होते. या संबंधित फोटो देखील व्हायरल झाले होते. या घटनेच्य़ा दुसऱ्याच दिवशी जोशूआ दा सिल्वाच्या आईने त्याची भेट घेतली होती. या भेटीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
दरम्यान टीम इंडिया 438 धावांवर ऑल आऊट झाली आहे. तर दुसऱ्या दिवस अखेर वेस्ट इंडिजने 1 विकेट गमावून 86 धावा केल्या आहेत. वेस्ट इंडिजकडून सध्या ब्रेथवेट आणि मॅकेंन्झी मैदानावर आहेत. आता वेस्ट इंडिज पहिल्या डावात किती धावा ठोकते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT