Women U19 World Cup फायनलमध्ये आज भारताच्या मुली इंग्लंडला भिडणार

मुंबई तक

• 06:46 AM • 29 Jan 2023

Under19 Women World Cup Final : आजचा दिवस खास आहे कारण भारताच्या मुली आज जग जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहेत. ICC तर्फे प्रथमच अंडर-19 महिला T20 विश्वचषक ( T20 Women U19 World Cup) स्पर्धा आयोजित केली जात आहे. भारत अंतिम फेरीत पोहोचला असून रविवारी त्याला इंग्लंडशी (India Vs England) सामना करायचा आहे. जिथे शेफाली वर्माच्या […]

Mumbaitak
follow google news

Under19 Women World Cup Final : आजचा दिवस खास आहे कारण भारताच्या मुली आज जग जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहेत. ICC तर्फे प्रथमच अंडर-19 महिला T20 विश्वचषक ( T20 Women U19 World Cup) स्पर्धा आयोजित केली जात आहे. भारत अंतिम फेरीत पोहोचला असून रविवारी त्याला इंग्लंडशी (India Vs England) सामना करायचा आहे. जिथे शेफाली वर्माच्या (Shefali Varma) नेतृत्वाखाली टीम इंडिया अंडर-19 विश्वचषक जिंकून इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. शेफालीने आदल्या दिवशी वाढदिवस साजरा केला, आता वाढदिवसाच्या गिफ्टची (Birthday Gift) वाट पाहत आहे. (Indian Women Under19 Team World Cup Final)

हे वाचलं का?

महिला क्रिकेट टीमचा ऐतिहासिक विजय; 36 धावांवर टीम केली ऑलआउट, 6 ओव्हरमध्ये संपवला सामना

19 वर्षीय शफाली वर्मा ही आता देशातील एक प्रसिद्ध नाव आहे, कारण तिने 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारताचे कर्णधारपद भूषवण्यापूर्वी वरिष्ठ संघात चमक दाखवली होती. शेफालीने वयाच्या 15 व्या वर्षी भारतात पदार्पण केले, T20 विश्वचषकात चमक दाखवली आणि आता ती वरिष्ठ संघात एक विश्वासार्ह आणि धडाकेबाज सलामीवीर आहे. पण इथे जबाबदारी वेगळी आहे, कारण शेफाली अंडर-19 संघाची कर्णधार आहे आणि देशाच्या आशा विश्वचषक जिंकण्याच्या आहेत. अंडर-19 महिला विश्वचषक फायनल पॉचेफस्ट्रूम, संध्याकाळी 5.15 (IST) होणार आहे.

अंडर-19 T-20 विश्वचषकातील टीम इंडियाच्या प्रवासाबद्दल बोलायचे झाल्यास, टीम इंडियाने या वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यापूर्वी एकूण 6 सामने खेळले आहेत. यापैकी 5 जिंकले आहेत. टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया वगळता प्रत्येक प्रतिस्पर्ध्याला पराभूत केले आहे, त्यामुळेच आता इंग्लंडला पराभूत करण्याची क्षमता आहे आणि वर्ल्डकपचे स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे.

भारतीय U19 महिला संघाच्या कॅप्टनची इतकी चर्चा का होतीय?

• विरुद्ध दक्षिण आफ्रिका – भारत ७ गडी राखून जिंकला

• विरुद्ध यूएई – भारत १२२ धावांनी जिंकला

• विरुद्ध स्कॉटलंड – भारत ८३ धावांनी जिंकला

• विरुद्ध ऑस्ट्रेलिया – भारत ७ विकेटने पराभूत

• विरुद्ध श्रीलंका – भारत ७ गडी राखून जिंकला

• वि. झीलंड – भारत ८ गडी राखून जिंकला (उपांत्य फेरी)

• विरुद्ध इंग्लंड – अंतिम फेरी, २९ जानेवारी

    follow whatsapp