भारत-पाकिस्तानमध्ये क्रिकेटचे संबंध निर्माण होणं गरजेचं – PCB प्रमुख रमीझ राजा

मुंबई तक

• 09:59 AM • 22 Oct 2021

भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-२० वर्ल्डकपमधला सामना सुरु होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. २४ ऑक्टोबरला दुबईत हा सामना रंगणार आहे. सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात आयसीसी स्पर्धांचा अपवाद वगळला तर सामने खेळवले जात नाहीत. परंतू राजकारण बाजूला ठेवून दोन्ही देशांमध्ये क्रिकेटचे संबंध निर्माण होणं गरजेचं असल्याचं मत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख रमीझ […]

Mumbaitak
follow google news

भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-२० वर्ल्डकपमधला सामना सुरु होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. २४ ऑक्टोबरला दुबईत हा सामना रंगणार आहे. सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात आयसीसी स्पर्धांचा अपवाद वगळला तर सामने खेळवले जात नाहीत. परंतू राजकारण बाजूला ठेवून दोन्ही देशांमध्ये क्रिकेटचे संबंध निर्माण होणं गरजेचं असल्याचं मत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख रमीझ राजा यांनी व्यक्त केलं आहे.

हे वाचलं का?

आशियाई क्रिकेट परिषदेची एक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत २०२३ च्या आशियाई चषकाचं यजमानपद पाकिस्तानकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी रमीझ राजा आणि बीसीसीआय अधिकाऱ्यांची भेट झाली. या भेटीविषयी माहिती देताना रमीझ राजा म्हणाले, “मी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांच्याशी भेटलो. दोघांमध्येही क्रिकेटचे संबंध प्रस्थापित होणं गरजेचं आहे. क्रिकेट आणि राजकारण नेहमी वेगळं ठेवण्यात यावं या मताचा मी आहे आणि आमची ही भूमिका कायम राहणार आहे.”

भारताने ठरवलं तर पाकिस्तान क्रिकेट क्षणार्धात कोसळेल – PCB प्रमुख रमीझ राजांनी व्यक्त केली भीती

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने पुन्हा सुरु करण्यासाठी खूप काम करावं लागणार आहे. परंतू त्याआधी दोन्ही बोर्डांमध्ये चांगली चर्चा होणं गरजेचं आहे. हे झाल्यानंतरच आपण किती दूरवर जाऊ शकतो हे पाहता येईल. यानिमीत्ताने आमची चांगली चर्चा झाली असंही रमीझ राजा म्हणाले. २०२२ साली श्रीलंकेत होणारा आशिया चषक हा टी-२० स्वरुपात तर २०२३ सालचा आशिया चषक हा वन-डे स्वरुपात खेळवण्यावर एकमत झालं आहे.

T-20 World Cup : मौका-मौका जाहीरातीत झळकणारा ‘तो’ पाकिस्तानी फॅन कोण आहे माहिती आहे?

    follow whatsapp