वेस्ट इंडिजविरुद्ध वन-डे मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ आता टी-२० मालिकेसाठी सज्ज झाला आहे. यानंतर भारतीय संघाला घरच्या मैदानावर श्रीलंकेचा सामना करायचा आहे. श्रीलंकेच्या या भारत दौऱ्यात काही महत्वाचे बदल झाले असून बीसीसीआयने या स्पर्धेसाठीचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे.
ADVERTISEMENT
नवीन वेळापत्रकानुसार, २४ फेब्रवारीला टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. लखनऊच्या मैदानावर पहिला टी-२० सामना खेळवला जाईल, यानंतर उर्वरित दोन टी-२० सामने ही धर्मशाळा येथे खेळवले जातील. यानंतर ४ ते ८ मार्च या कालावधीत पहिला कसोटी सामना मोहाली येथे खेळवण्यात येईल, तर दुसरा कसोटी सामना १२ ते १६ मार्च दरम्यान बंगळुरुत खेळवला जाईल.
आधी ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे पहिला कसोटी सामना २५ फेब्रुवारीपासून बंगळुरुत सुरु होणार होता. टी-२० सामन्यांची मालिका १३ मार्चपासून सुरु होणार होती, परंतू बीसीसीआयने आता यामध्ये बदल करुन टी-२० सामन्यांची मालिका आधी खेळवण्याचं ठरवलं आहे.
ADVERTISEMENT