India Vs Canada, T20 World cup 2024 : आयसीसी टी20 वर्ल्ड कपमधील टीम इंडियाचा (Team India) कॅनडा (Canada) विरूद्धचा आजचा सामना पावसामुळे रद्द झाला आहे. फ्लोरिडातील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियमवर हा सामना रंगणार होता. पावसामुळे हा सामना आधीच उशीरा सुरू होणार होता. त्यानंतर आता रात्री 9 वाजता पंचांनी मैदानाची पाहणी असता, सामना खेळण्यालायक खेळपट्टी नसल्याने पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांची निराशा झाली आहे. ( india vs canada match live scores t20 world cup 2024 ind vs can live score rohit sharma virat kohli)
ADVERTISEMENT
Accuweather च्या रिपोर्टनसार आजच्या सामन्यावर पासवाचे सावट होते.फ्लोरिडामध्ये आज (15 जून) पावसाची शक्यता 86 टक्क्यांपर्यंत वर्तवण्यात आली होती. आणि 16 जून रोजी 80 टक्क्यांपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता होती. खरं तर येथे पूर्वीपासूनच पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पावसामुळे सामना रद्द होण्याची शक्यता आधीपासूनच होती.
हे ही वाचा : राणे थेट म्हणाले, 'कोकणातून मी शिवसेना संपवली..' नेमकं कोणाला डिवचलं?
टी20 वर्ल्ड कपमध्ये आज 33 वा सामना भारत आणि कॅनडात रंगणार होता. मात्र पावसामुळे हा सामना होऊ शकला नाही. खरं तर पाऊस पडत असल्याने सामना 9 वाजता सुरु होणार होता. मात्र अंपायर्सनी फ्लोरिडा येथील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियममधील मैदानाची परिस्थितीचा आढावा घेतला असता. खेळपट्टी खेळण्यासाठी योग्य नव्हती. त्यामुळे आजचा सामना रद्द करण्यात आला. आता भारतीय संघ थेट 20 जून रोजी सुपर 8 मध्ये अफगाणिस्तानशी भिडणार आहे.
पॉईंट्स टेबसमध्ये भारत कितव्या स्थानी?
सध्या भारतीय संघ अ गटातील गुणतालिकेत 7 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तर अमेरिकन संघ 5 गुणांसह दुसऱ्या स्थानावर असून सुपर 8 मध्येही प्रवेश घेतला आहे. अमेरिकेने पाकिस्तान आणि कॅनडाचा पराभव केला होता, तर भारताच्या हातून त्यांचा पराभव झाला होता. कॅनडाचा संघ 3 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. यानंतर पाकिस्तान आणि आयर्लंडचा क्रमांक लागतो.
ADVERTISEMENT