बीसीसीआयने टीम इंडियाच्या इंग्लंडविरुद्ध आगामी टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. ४ टेस्ट मॅचची सिरीज संपल्यानंतर दोन्ही संघांमध्ये अहमदाबादच्या मैदानावर पाच टी-२० सामने खेळवले जातील. मुंबईकर सूर्यकुमार यादवला या संघात स्थान देण्यात आलं आहे. याव्यतिरीक्त आयपीएलच्या गेल्या हंगामात चांगली कामगिरी करणाऱ्या इशान किशन, वरुण चक्रवर्ती आणि राहुल तेवतिया यांनाही भारतीय संघात स्थान देण्यात आलेलं आहे. १२ मार्चपासून या टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे.
ADVERTISEMENT
आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्द मालिकेसाठी भारतीय संघात सूर्यकुमार यादवला स्थान मिळेल अशी सर्वांना आशा होती. परंतू निवड समितीने त्यावेळी सूर्यकुमारला स्थान दिलं नाही. अखेरीस इंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी सूर्यकुमारचा भारतीय संघात विचार करण्यात आला आहे. याव्यतिरीक्त भुवनेश्वर कुमारनेही भारतीय संघात पुनरागमन केलं आहे,
टी-२० मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ –
विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा (व्हाईस – कॅप्टन), लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, इशान किशन, युजवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर
ADVERTISEMENT