IPL 2021 ऑक्शनसाठी १०९७ प्लेअर्सनी नाव नोंदवलं

मुंबई तक

• 04:44 AM • 06 Feb 2021

आयपीएलच्या आगामी सिझनसाठी आपलं नाव नोंदवण्याची वेळ आता संपली असून आतापर्यंत १०९७ प्लेअर्सनी ऑक्शनसाठी आपलं नाव रजिस्टर केलं आहे. इंग्लंडचा कॅप्टन जो रुट, ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क यांनी यंदाच्या सिझनमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला असून बांगलादेशचा ऑलराऊंडर शाकीब अल हसन, एस.श्रीसंत यांनीही ऑक्शनसाठी आपलं नाव नोंदवलं आहे. NEWS ?: 1097 players register for IPL 2021 Player […]

Mumbaitak
follow google news

आयपीएलच्या आगामी सिझनसाठी आपलं नाव नोंदवण्याची वेळ आता संपली असून आतापर्यंत १०९७ प्लेअर्सनी ऑक्शनसाठी आपलं नाव रजिस्टर केलं आहे. इंग्लंडचा कॅप्टन जो रुट, ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क यांनी यंदाच्या सिझनमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला असून बांगलादेशचा ऑलराऊंडर शाकीब अल हसन, एस.श्रीसंत यांनीही ऑक्शनसाठी आपलं नाव नोंदवलं आहे.

हे वाचलं का?

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरनेही ऑक्शनसाठी आपलं नाव नोंदवलं असून त्याची बेस प्राईज २० लाख एवढी निश्चीत करण्यात आली आहे. नाव नोंदवलेल्यापैकी ८१४ प्लेअर्स हे भारतीय असून २८३ प्लेअर्स हे परदेशी आहेत. परदेशी खेळाडूंमध्ये वेस्ट इंडिजच्या सर्वाधिक म्हणजेच ५६ प्लेअर्सनी या सिझनसाठी आपलं नाव नोंदवलं आहे. त्याखालोखाल ऑस्ट्रेलियाच्या ४२ आणि दक्षिण आफ्रिकेच्या ३८ प्लेअर्सनी आपलं नाव नोंदवलं आहे.

आयसीसीने घातलेली दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगून आल्यानंतर शाकीबने पुन्हा एकदा आयपीएलमध्ये आपलं नशीब आजमावण्याचं ठरवलं आहे. याचसोबत आयपीएल स्पॉट फिक्सींग प्रकरणी शिक्षा भोगून आलेल्या श्रीशांतनेही आपलं नाव यंदाच्या ऑक्शनमध्ये नोंदवलं असून त्याची बेस प्राईज ७५ लाख एवढी ठरवण्यात आली आहे. याव्यतिरीक्त हरभजन सिंग, केदार जाधव, स्टिव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मोईन अली, सॅम बिलींग्ज, जेसन रॉय, मार्क वूड, लियाम प्लंकेट आणि कॉलिन इन्ग्राम या प्लेअर्सची बेस प्राईज सर्वाधिक म्हणजेच २ कोटी इतकी ठरवण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियात भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या हनुमा विहारीची बेस प्राईज १ कोटी तर चेतेश्वर पुजाराची बेस प्राईज ५० लाख ठरवण्यात आली आहे. १८ फेब्रुवारीला आयपीएलच्या चौदाव्या सिझनचं ऑक्शन चेन्नईत रंगणार आहे.

    follow whatsapp