आयपीएलच्या पंधराव्या हंगामात गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्जला पराभवाचा सामना करावा लागला. सहा विकेट्सने सामना जिंकत कोलकाता नाईट रायडर्सने यंदाच्या हंगामाची विजयी सुरुवात केली. चेन्नईने हा सामना गमावला असला तरीही पहिल्या सामन्याअखेरीस क्रिकेट रसिकांमध्ये चर्चा होती ती ड्वेन ब्राव्होच्या कामगिरीची.
ADVERTISEMENT
ब्राव्होने पहिल्या सामन्यात ३ विकेट घेत आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या लसिथ मलिंगाच्या विक्रमाशी बरोबरी केली. कोलकात्याच्या सॅम बिलिंग्जला आपल्या जाळ्यात अडकवत ब्राव्होने मलिंगाच्या १७० विकेटच्या विक्रमाशी बरोबरी केली.
आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे सर्वोत्तम पाच गोलंदाज –
१) लसिथ मलिंगा – १७० विकेट्स
२) ड्वेन ब्राव्हो – १७० विकेट्स
३) अमित मिश्रा – १६६ विकेट्स
४) पियुष चावला – १५७ विकेट्स
५) हरभजन सिंग – १५० विकेट्स
IPL 2022 : KKR ची विजयी सुरुवात, चेन्नईचा सहा विकेट्सनी उडवला धुव्वा
३१ मार्चला चेन्नई सुपरकिंग्ज आपला दुसरा सामना लखनऊ संघासोबत खेळणार आहे. या सामन्यात ब्राव्होकडे मलिंगाला मागे टाकण्याची संधी आहे. ड्वेन ब्राव्हो हा गेल्या काही वर्षांपासून चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा सदस्य आहे. याआधी त्याने मुंबई इंडियन्स आणि गुजरात लायन्स संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे.
IPL 2022 : Thala is Back ! तब्बल २ वर्षांनी धोनीचं आयपीएलमध्ये अर्धशतक
ADVERTISEMENT