IPL 2022 : अटीतटीच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा विजय, लखनऊचा ५ विकेट्सने पराभव

मुंबई तक

• 06:12 PM • 28 Mar 2022

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात आपला पहिला सामना खेळणाऱ्या गुजरात टायटन्स संघाने धडाकेबाज सुरुवात केली आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर लखनऊ सुपरजाएंट संघाविरुद्ध सामना खेळताना गुजरातने विजयासाठी मिळालेलं १५९ धावांचं आव्हान ५ विकेट राखून पूर्ण केलं. राहुल तेवतियाने मोक्याच्या क्षणी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर गुजरातने या सामन्यात बाजी मारली. पहिल्यांदा बॅटींग करणाऱ्या लखनऊ सुपरजाएंटची सुरुवात खराब झाली. मोहम्मद शमीने […]

Mumbaitak
follow google news

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात आपला पहिला सामना खेळणाऱ्या गुजरात टायटन्स संघाने धडाकेबाज सुरुवात केली आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर लखनऊ सुपरजाएंट संघाविरुद्ध सामना खेळताना गुजरातने विजयासाठी मिळालेलं १५९ धावांचं आव्हान ५ विकेट राखून पूर्ण केलं. राहुल तेवतियाने मोक्याच्या क्षणी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर गुजरातने या सामन्यात बाजी मारली.

हे वाचलं का?

पहिल्यांदा बॅटींग करणाऱ्या लखनऊ सुपरजाएंटची सुरुवात खराब झाली. मोहम्मद शमीने लखनऊच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांना आपल्या भेदक माऱ्याने झटपट आऊट केलं. ४ बाद २९ अशा बिकट अवस्थेत अडकलेल्या लखनऊला दीपक हुडा आणि आयुष बदानी यांनी सावरलं. दोघांनीही पाचव्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी करुन संघाच्या डावाला आकार दिला. मैदानात चौफेर फटकेबाजी करताना दीपक हुडा आणि बदानी या दोघांनीही आपली अर्धशतक पूर्ण केली.

IPL 2022 : नवीन संघाची सुरुवात शून्याने, पहिल्याच बॉलवर शमीने राहुलला बनवलं बकरा

राशिद खानने दीपक हुडाला ५५ धावांवर आऊट केलं. यानंतर कृणाल पांड्याने आयुष बदोनीच्या साथीने संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली. गुजरातकडून शमीने ३, अरॉनने २ तर राशिद खानने १ विकेट घेतली.

IPL 2022 : गिलचा हा कॅच पाहून तुम्हालाही येईल कपिल देवची आठवण, पाहा हा व्हिडीओ

प्रत्युत्तरादाखल गुजरातची सुरुवातही अडखळती झाली. दुष्मंता चमिराने शुबमन गिल आणि विजय शंकरला झटपट आऊट करत गुजरातला धक्का दिला. यानंतर मॅथ्यू वेड, हार्दिक पांड्या यांनी संघाचा डाव छोटेखानी भागीदारी करुन सावरला. हे दोन्ही फलंदाज एकामागोमाग एक माघारी परतल्यानंतर लखनऊचा संघ सामन्यात वरचढ झाला होता. परंतू राहुल तेवतियाने हुडाच्या एकाच ओव्हरमध्ये २२ धावा काढत सामन्याचं चित्र पालटवून टाकलं.

लखनऊने यानंतर सामन्यात कमबॅक करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले.

    follow whatsapp