आयपीएलच्या इतिहासातला सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळख असलेल्या मुंबई इंडियन्सने पंधराव्या हंगामाची सुरुवात केली आहे. मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडीयमवर मुंबईचा पहिला सामना दिल्लीसोबत रंगला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने अव्वल स्थानाकडे वाटचाल सुरु केली आहे.
ADVERTISEMENT
आयपीएलमध्ये सर्वात जास्त सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. रोहितने दिनेश कार्तिकला मागे टाकत दुसरं स्थान पटकावलं आहे. या यादीत महेंद्रसिंह धोनी अव्वल स्थानावर असून विराट कोहली चौथ्या स्थानावर आहे.
सर्वात जास्त आयपीएल सामने खेळणाऱ्या खेळाडूंची यादी –
-
महेंद्रसिंह धोनी – २२१ सामने
-
रोहित शर्मा – २१४ सामने
-
दिनेश कार्तिक – २१३ सामने
-
विराट कोहली – २०७ सामने
दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंतने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. ज्यानंतर रोहित शर्माने इशान किशनच्या साथीने संघाला चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी केली. विशेषकरुन रोहित शर्माने आक्रमक पवित्रा घेत दिल्लीच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. अखेरीस कुलदीप यादवने रोहितला ४१ धावांवर आऊट करत मुंबईची जोडी फोडली. आपल्या धडाकेबाज खेळीत रोहित शर्माने ३२ बॉलमध्ये ४ फोर आण २ सिक्स लगावले.
IPL 2022 : Thala is Back ! तब्बल २ वर्षांनी धोनीचं आयपीएलमध्ये अर्धशतक
ADVERTISEMENT