काही दिवसांपूर्वीच आयपीएलच्या आगामी हंगामाचा लिलाव बंगळुरुत पार पडला. ज्यात अनेक खेळाडूंवर कोट्यवधींच्या बोली लागल्या तर काहींच्या पदरात निराशा पडली. २६ मार्चपासून आयपीएलचा आगामी हंगाम सुरु होणार आहे आणि हा संपूर्ण हंगाम यंदा भारतातच खेळवला जाईल असं बीसीसीआयने जाहीर केलंय.
ADVERTISEMENT
आता संपूर्ण हंगाम बीसीसीआय जर भारतात खेळवणार असेल तर कोरोना आणि त्यानिमीत्ताने येणाऱ्या सर्व बंधनांचं काय? हा प्रश्न साहजिकच क्रिकेटप्रेमींच्या मनात येणं साहजिक आहे. बीसीसीआयने यंदाच्या हंगामात कोरोनामुळे स्पर्धा मध्यावधीत स्थगित करायला लागू नये आणि खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ नये तसेच सध्याच्या खडतर काळात खेळाडूंना जास्त प्रवास करायला लागू नये म्हणून यंदाचं आयपीएल मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्येच आयोजित करण्याचं ठरवलं आहे.
IPL 2022: बोली लावली मुंबईने खेळाडू विकला दिल्लीला, लिलावात चारु शर्मांचा घोळ पाहिलात का?
आयपीएलसाठी बीसीसीआयने या दोन शहरांचीच का निवड केली आणि काय असणार आहे BCCI चा प्लान हे आज जाणून घेणार आहोत.
IPL 2022: ठरलं… 26 मार्चपासून IPLचा धमाका, ‘या’ तारखेला रंगणार फायनल!
या दोन शहरांमध्येच आयपीएलच्या सामन्यांचं आयोजन करण्याचं महत्वाचं कारण म्हणजे मैदानांची उपलब्धता. मुंबईत वानखेडे स्टेडीअम, ब्रेबॉन स्टेडीअम आणि नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडीअम ही तीन मैदानं ठराविक अंतरावर उपलब्ध आहेत. याचसोबत पुण्यातील गहुंजे स्टेडीअमचा एक पर्याय बीसीसीआयकडे तयार आहे. या चार मैदानांमुळे खेळाडूंना बायो बबलमध्ये राहिल्यावर फारसा प्रवास करावा लागणार नाही आणि ज्यामुळे बीसीसीआय आणि संघमालकांचा वेळ-पैसा यांची बचत होणार आहे.
IPL 2022: CSK-KKR आणि दिल्लीची मदार महाराष्ट्रातील खेळाडूंवर, मुंबईची स्थानिक खेळाडूंकडे पाठ
यंदा आयपीएलमध्ये १० संघ असल्यामुळे ७० साखळी सामने होणार आहेत. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या सामन्यांसाठी खेळाडूंना जास्त विमान प्रवास करावा लागू नये यासाठी दोन शहरांची निवड झालेली असल्याचं BCCI सेक्रेटरी जय शहा यांनी सांगितलं. नॉकआऊट स्टेज आणि अंतिम फेरीचा सामना कुठे होईल याबद्दल अद्याप निर्णय झालेला नसला तरीही हे सामने अहमदाबाद येथे नरेंद्र मोदी मैदानावर खेळवले जातील असं कळतंय.
IPL 2022: ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैना यंदा अनसोल्ड, चेन्नई सोडा इतर संघांनीही दाखवला नाही रस
आता जर सर्व सामने हे मुंबईच्या परिघात खेळवले जाणार असल्यामुळे यासाठी तयारीला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वीच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि BCCI च्या पदाधिकाऱ्यांशी बैठक घेतली. या बैठकीत स्पर्धा निर्विघ्नपणे पार पाडली जावी यासाठी काही निर्णय घेण्यात आले आहेत.
IPL 2022 साठी महाराष्ट्र सरकारचा असा आहे प्लान –
१) प्रत्येक संघ हा वेगळ्या हॉटेलमध्ये वास्तव्यासाठी असेल जेणेकरुन बायो बबल मोडलं जाणार नाही.
२) सामन्याच्या वेळी खेळाडूंना हॉटेल ते मैदानात प्रवासासाठी एक ग्रीन कॉरीडोर तयार केला जाईल.
३) ८ मार्चला सर्व खेळाडू आपापल्या संघाने तयार केलेल्या बायो सिक्युअर बबलमध्ये प्रवेश करतील. यानंतर साधारण ३ ते ५ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर १४ ते १५ मार्चपासून सरावाला सुरुवात होईल.
४) संघांच्या सरावासाठी बीसीसीआयने MCA च्या अंतर्गत असलेल्या ठाणे, BKC येथील मैदानं; CCI चं ब्रेबॉन स्टेडीअम, डी.वाय.पाटील स्टेडीअम आणि रिलायन्सचं नवी मुंबईतील कॉर्पोरेट पार्कचा समावेश केला आहे.
५) स्पर्धेदरम्यान समजा कोणत्याही खेळाडूला किंवा इतर सदस्यांना कोरोनाची लागण झाली तर त्यांच्यासाठी वेगळी सोय केली जाईल.
६) मुंबईत प्रवेश करण्याआधी सर्व खेळाडूंना ४८ तास आधी RTPCR टेस्ट करुन घ्यावी लागणार आहे. क्वारंटाईन कालावधी जर तीन दिवसांचा असेल तर प्रत्येक दिवशी खेळाडूंची चाचणी होईल आणि हा कालावधी जर पाच दिवसांचा असेल पहिल्या दिवशी, तिसऱ्या दिवशी आणि पाचव्या दिवशी ही चाचणी होणार आहे.
कल्याणचा तुषार देशपांडे आयपीएलमध्ये धोनीसोबत खेळणार, भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळण्याचं स्वप्न
याचसोबत १५ एप्रिलपर्यंत होणाऱ्या सामन्यांसाठी महाराष्ट्र सरकारने २५ टक्के प्रेक्षकांना मैदानात उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. यानंतरच्या सामन्यांना प्रेक्षकांना संधी द्यायची की नाही याचा निर्णय परिस्थिती पाहून घेतला जाणार आहे. मागच्या वर्षी आयपीएलची स्पर्धा बीसीसीआयला मध्यावधीत स्थगित करुन नंतर युएईला खेळवावी लागली होती. त्यामुळे यंदा हा धोका टाळण्यासाठी बीसीसीआयने दोन शहरांमध्येच स्पर्धेचं आयोजन करायचं ठरवलं आहे.
ADVERTISEMENT