KKR vs DC यांच्यात रंगणार हाय व्होल्टेज सामना, अशी असू शकते प्लेइंग 11 टीम...

रोहिणी ठोंबरे

• 06:16 PM • 29 Apr 2024

IPL 2024 KKR Vs DC Playing 11 Prediction : इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL) सीझनमध्ये आज (29 एप्रिल) कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात रोमांचक सामना खेळला जाणार आहे. या सामन्याला कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून सुरूवात होईल.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

KKR vs DC दोन्ही संघात कशी असणार लढत?

point

कोलकाता-दिल्लीची अशी असू शकते प्लेइंग 11 टीम...

IPL 2024 KKR Vs DC Playing 11 Prediction : इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL) सीझनमध्ये आज (29 एप्रिल) कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात रोमांचक सामना खेळला जाणार आहे. या सामन्याला कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून सुरूवात होईल. (IPL 2024 KKR Vs DC match on Eden Gardens this should be Playing 11 team Prediction

हे वाचलं का?

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता (KKR) संघाने आतापर्यंत 8 पैकी 5 सामने जिंकले आहेत. यासह हा संघ सध्या पॉईंटर्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली (DC) संघाने आतापर्यंत 10 पैकी 5 सामने जिंकले आहेत आणि सध्या पॉईंटर्स टेबलमध्ये हा संघ सहाव्या स्थानावर आहे.

हेही वाचा : Narendra Modi : ''काँग्रेसने 40 वर्ष सैनिकांच्या कुटुंबियांना...'',

गेल्या सामन्यात KKR ने पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्ध 261 धावा केल्या होत्या. मात्र, या सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे दिल्लीने मुंबई इंडियन्स (MI) विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात 257 धावा केल्या होत्या. दिल्लीने हा सामना 10 धावांनी जिंकला.

KKR vs DC दोन्ही संघात कशी असणार लढत?

या सामन्यात हे दोन्ही संघ पुन्हा एकदा धावांची तुफानी खेळी खेळताना दिसू शकतात. केकेआर संघाच्या फलंदाजीत फिल सॉल्ट, सुनील नरेन, अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल आणि रिंकू सिंग यांसारखे स्फोटक फलंदाज आहेत.

हेही वाचा : पुन्हा 'सूरत पॅटर्न'! काँग्रेसची आणखी एक जागा गेली, उमेदवारानेच केला मोठा 'गेम'

तर दिल्ली कॅपिटल्सच्या बॅटिंग लाइनअपमध्ये जेक फ्रेझर-मॅकगर्क, कुमार कुशाग्रा, शाई होप, ऋषभ पंत, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल आणि अक्षर पटेल सारखे मजबूत फलंदाज आहेत. मॅकगर्कने या सीझनमध्ये दोनदा 15 चेंडूत अर्धशतक केले आहे. अशा प्रकारे आजच्या सामन्यात दोन्ही संघांकडून दमदार फलंदाजी पाहायला मिळते.

 

कोलकाता-दिल्लीची अशी असू शकते प्लेइंग 11 टीम...

दिल्ली कॅपिटल्स: जेक फ्रेझर-मॅकगर्क, कुमार कुशाग्रा, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, लिझाद विल्यम्स, मुकेश कुमार आणि खलील अहमद

हेही वाचा : ''मोहिते पाटलांना सत्तेचा माज, मी आमदार झालो म्हणून...'',

कोलकाता नाईट रायडर्स: फिल सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, आंग्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, दुष्मंथा चमीरा, वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा

    follow whatsapp