IPL 2024: विजेता-उपविजेता संघावर पडणार पैशांचा पाऊस! पराभूत संघाला किती कोटी मिळणार?

रोहिणी ठोंबरे

14 May 2024 (अपडेटेड: 14 May 2024, 01:01 PM)

2024 Indian Premier League : प्राईज मनीबद्दल बोलायचं झाले तर विजेतेपद मिळवणाऱ्या संघाला करोडो रुपये मिळतील. यासोबतच पराभूत संघांनाही चांगली रक्कम मिळणार आहे. ही रक्कम किती कोटी असेल हे माहीत आहे का? चला तर मग याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

IPL 2024 ची प्राईज मनी किती?

point

विजेतेपद मिळवणाऱ्या संघाला करोडो रुपये मिळतील.

IPL 2024 Price Money : IPL च्या 17 व्या सीझनमधील प्लेऑफ सामने 21 मे पासून सुरू होणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना 26 मे रोजी चेन्नई येथील एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium) होणार आहे. हा सामना सायंकाळी साडेसात वाजता सुरू होईल. त्याआधीचे क्वालिफायर 2 चा सामनाही चेपॉक स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. अशात आयपीएल जिंकणाऱ्या संघाला यावेळी किती पैसे मिळतील माहीत आहे का? चला तर मग याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. (ipl 2024 know about price money of Winner and runner-up How many rupees will the losing team get)

हे वाचलं का?

IPL 2024 ची प्राईज मनी किती?

प्राईज मनीबद्दल बोलायचं झाले तर विजेतेपद मिळवणाऱ्या संघाला करोडो रुपये मिळतील. यासोबतच पराभूत संघांनाही चांगली रक्कम मिळणार आहे. माहितीनुसार, विजेता संघाला 20 कोटी रूपये मिळणार आहे. याआधीच्या तुलनेत बक्षिसाची ही रक्कम काही पटींनी वाढवण्यात आली असल्याचं बोललं जात आहे. एकूण प्राईज मनीचा आकडा हा 46 कोटी 50 लाख रूपये इतका आहे.

हेही वाचा: घाटकोपर दुर्घटनेत 14 मुंबईकरांनी गमावला जीव, कोणावर दाखल झाला गुन्हा?

तसंच उपविजेता संघाला 13 कोटी रुपये दिले मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. गेल्या सीझनमध्ये चेन्नई सुपर किंग्ज चॅम्पियन ठरला होता. त्यांनी अंतिम फेरीत गुजरात टायटन्सचा पराभव केला होता. तिसऱ्या स्थानी असलेल्या संघाला 7 कोटी रूपये मिळतील.

हेही वाचा: Mumbai Tak Chavadi : '...तर मी दोन पक्ष, एक कुटुंबं फोडलं असतं'

तर, चौथ्या स्थानी असणाऱ्या संघाला 6 कोटी 50 लाख रूपये मिळणार आहेत. त्याचबरोबर ऑरेंज आणि पर्पल कॅप विजेत्याला 15 लाख रूपये मिळणार आहेत. ज्या खेळाडूंनी त्या सीझनमध्ये सर्वाधिक धावा आणि विकेट्स घेतल्या असतील अशा खेळाडूंना ही ऑरेंज आण पर्पल कॅप देण्यात येते.

 

    follow whatsapp