आयपीएलच्या उर्वरित सामन्यांसाठी इंग्लंडविरुद्ध टेस्ट सिरीजच्या वेळापत्रकात बदल करण्यासाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने नकार दिला. यानंतर बीसीसीआयने आयपीएलच्या उर्वरित ३१ मॅचसाठी नवीन पर्याय शोधला आहे. सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात म्हणजेच १८ किंवा १९ तारखेला युएईत ही स्पर्धा सुरु करण्याचा बीसीसीआयचा विचार आहे.
ADVERTISEMENT
BCCI ला धक्का, IPL 2021 साठी टेस्ट सिरीजमध्ये बदल करण्यासाठी ECB चा नकार?
स्पर्धा पूर्ण करण्यासाठी बीसीसीआयला फार कमी दिवसांचा कालावधी मिळणार असल्यामुळे या कालावधीत १० डबल हेडर सामने खेळवण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. BCCI च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना याबद्दल माहिती दिली. ज्यानुसार अंतिम सामना हा ऑक्टोबर ९ किंवा १० तारखेला खेळवला जाईल. सध्याच्या परिस्थितीत बीसीसीआय, संघमालक, ब्रॉडकास्टर्स आणि इतर सर्व घटकांसाठी हा सर्वोत्तम पर्याय असल्याचं बीसीसीआयचं म्हणणं आहे. खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर बीसीसीआयने २९ सामन्यांनंतर आयपीएलचा चौदावा हंगाम स्थगित केला होता.
T-20 World Cup : ICC भारताऐवजी पर्यायी जागांचा विचार करणार
“BCCI ने आयपीएलचे उर्वरित सामने खेळवण्यासंदर्भात सर्व महत्वाच्या घटकांशी चर्चा केली आहे. १८ ते २० सप्टेंबरदरम्यान ही स्पर्धा सुरु करण्याचा विचार आहे. १८ आणि १९ तारखेला शनिवार-रविवार असल्यामुळे या दिवशी स्पर्धा सुरु केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे विकेंडचा विचार करुन ऑक्टोबर ९ किंवा १० तारखेला अंतिम सामना खेळवला जाऊ शकतो.” BCCI च्या अधिकाऱ्याने पीटीआयला माहिती दिली.
कोरोनाविरुद्ध लढाईत BCCI ही मैदानात, २ हजार Oxygen Concentrators करणार दान
आम्ही सध्या प्रवास, हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था या सर्व गोष्टी अंतिम स्वरुपात आणत आहोत. आम्ही सध्या १० डबल हेडर सामने आणि ७ सामने संध्याकाळी खेळवण्याच्या प्रयत्नात आहोत. इंग्लंडविरुद्धची भारताची अखेरची टेस्ट मॅच १४ सप्टेंबरला मँचेस्टरमध्ये संपणार आहे. यानंतर आयपीएलमध्ये खेळणारे सर्व खेळाडू चार्टर्ड फ्लाईटने युएईत दाखल होतील. भारत आणि इंग्लंडचे जे खेळाडू या स्पर्धेत खेळणार असतील ते एकाच विमानाने बायो बबलमधून दुबईसाठी रवाना होतील.
याचसोबत वेस्ट इंडिजचे खेळाडूही दुबईसाठी रवाना होतील. इंग्लंड आणि कॅरेबियन बेटांवरुन येणाऱ्या खेळाडूंना युएईत तीन दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागणार आहे. आयपीएलच्या एका संघातील अधिकाऱ्याने बीसीसीआयने या Travel Plan बद्दल माहिती दिल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. “बीसीसीआयने आम्हाला स्पर्धेसाठी तयार रहा असं सांगितलं असून १५ ते २० सप्टेंबर दरम्यान स्पर्धेला सुरुवात होईल असं आम्हाला कळतंय.”
ADVERTISEMENT