गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढीस लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये दहशतवादी हे सामान्य माणसांना लक्ष्य करत आहेत. जम्मू काश्मीरमध्ये टार्गेट करून निष्पाप लोकांची हत्या केली जाते आहे. अशा सगळ्या वातावरणात UAE मध्ये होणाऱ्या टी 20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचा क्रिकेट सामना होणार आहे. 24 ऑक्टोबरला होणाऱ्या या सामन्याला विरोध दर्शवला जातो आहे. अशात आता असदुद्दीन ओवेसी यांनीही यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले आहेत ओवेसी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवर काही बोलत नाहीत. तसंच वाढत्या महागाईबद्दलही ते काही बोलत नाही. पाकिस्तानला घरमें घुसके मारेंगे म्हणणारे मोदी चीनबद्दल काहीही करत नाहीत. भारताचे ९ जवान मारले गेले तरीही तुम्ही त्यांच्यासोबत टी 20 सामना खेळणार आहात का? पाकिस्तान काश्मीरमध्ये लोकांच्या जिवाशी टी 20 खेळतो आहे. गुप्तचर यंत्रणा, अमित शाह काय करत आहेत? असाही प्रश्न ओवेसींनी विचारला आहे.
भारत पाकिस्तानचा हा सामना 24 तारखेला UAE मध्ये होणार आहे. मात्र सामान्य माणसांसहीत अनेक राजकीय नेतेही हा सामना रद्द करण्याची मागणी करत आहेत. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह, बिहारचे उपमुख्यमंत्री तारा किशोर प्रसाद यांनीही हा सामना रद्द करण्याची मागणी केली आहे. मात्र बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. आयसीसीने जे ठरवलंय त्यात बदल होणार नाही असं त्यांनी म्हटलं होतं. आता ओवेसींनी या मॅचवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला आहे.
Ind vs Pak सामन्यासाठी ही योग्य वेळ नाही, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंग यांचा विरोध
काय म्हणाले गिरीराज सिंह?
‘माझ्या मते भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याता पुन्हा विचार व्हावा. दोन्ही देशांमधले सीमीरचे संबंध सध्या चांगले नाहीत. टी-२० विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळवण्याची ही योग्य वेळ नाही. दोन्ही देशांमध्ये सीमेवर तणावाची परिस्थिती आहे. आपल्याला मानवतेचं रक्षण करणं गरजेचं आहे आणि अशी कोणतीही गोष्ट करायची नाहीये ज्यामुळे दोन्ही देशांमधील नातेसंबंधावर ताण येईल.’ जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी सामान्य नागरिकांच्या हत्या केल्यानंतर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला गिरीराज सिंह उत्तर देत होते.
ADVERTISEMENT