Rohit pawar : शरद पवारांचे दोन नातू आले समोरासमोर, एकाने मारलं मैदान

मुंबई तक

• 09:35 AM • 09 Jan 2023

MCA अर्थात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (maharashtra cricket association) राजकारणापासून दूर राहिलेल्या शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्तक्षेपानंतरही पवारांच्या दोन नातवांमध्ये (sharad pawar grandson) निवडणूक रंगली. अर्थात यात बाजी मारली ती पवारांच्या एका नातवानेच. शरद पवारांचे 2 नातू रोहित पवार (Rohit Pawar) आणि अभिषेक बोके (Abhishek Boke) हे MCA च्या निवडणुकीच्या (maharashtra cricket association election 2023) […]

Mumbaitak
follow google news

MCA अर्थात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (maharashtra cricket association) राजकारणापासून दूर राहिलेल्या शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्तक्षेपानंतरही पवारांच्या दोन नातवांमध्ये (sharad pawar grandson) निवडणूक रंगली. अर्थात यात बाजी मारली ती पवारांच्या एका नातवानेच. शरद पवारांचे 2 नातू रोहित पवार (Rohit Pawar) आणि अभिषेक बोके (Abhishek Boke) हे MCA च्या निवडणुकीच्या (maharashtra cricket association election 2023) रिंगणात आमनेसामने आले.

हे वाचलं का?

MCA च्या संलग्न क्लबमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले रोहित पवार हे शरद पवारांचे ज्येष्ठ बंधू आप्पासाहेब पवार यांचे नातू लागतात. तर, अभिषेक बोके हे पवारांच्या भगिनीचे नातू आहेत.

रविवारी गहुंजे इथे झालेल्या MCA च्या निवडणुकीत शरद पवारांचे दोन नातू निवडणुकीच्या मैदानात आमनेसमाने आले. या निवडणुकीत माजी क्रिकेटपटू शंतनू सुगवेकर आणि सुनील संपतलाल मुथा यांनी अर्ज दाखल केले होते.

‘आजोबांनी चीअरलीडर्स आणल्या, हे महाशय..’, राणेंची शरद पवारांवर टीका

ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून अजित पवारांनाही साकडं घालण्यात आलं होतं. संघटनेतल्या 40 मतदारांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्नही अजित पवारांनी केला, पण त्यानंतरही रोहित पवार हे संघटनेवरील वर्चस्वासाठी आग्रही होते.

MCA Election : शरद पवारांनी केली मध्यस्थी

त्यानंतर मग खुद्द शरद पवारांनाच यात घालावं लागलं. त्यानंतर अभिषेक बोके यांना माघार घेण्यासाठी आदेश देण्यात आल्याची बातमी ‘महाराष्ट्र टाईम्स’ने दिलीये. या आदेशामुळे अभिषेक बोके यांचा दणकून पराभव झाल्याचंही बोललं जातंय.

रोहित पवारांनी माघार न घेतल्याने मग निवडणूक झाली. ज्यात रोहित यांना एकूण 24 मतदारांपैकी सर्वाधिक मतदान झालं. रोहित पवार यांना 22 मतं पडली. सर्वाधिक मतं पडलेल्या रोहित पवारांची त्यानंतर बिनविरोध अध्यक्ष पदासाठी निवड झाली.

Rohit Pawar महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे नवे अध्यक्ष; किरण सामंत उपाध्यक्षपदी

संपतलाल मुथा यांना त्यांच्याखालोखाल २१ मतं पडली तर अभिषेक बोके यांना अवघ्या ३ मतांवर समाधान मानावं लागलं. पवारांच्या 2 नातवांमध्ये झालेल्या या निवडणुकीत शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना फायदा झाल्याचं बोललं जातंय. किरण सामंत यांची उपाध्यक्ष पदावर निवड झाली.

    follow whatsapp