Maulana Shahabuddin Razvi On Mohammed Shami : रमजानचा पवित्र महिना सुरु झाला आहे. अशातच मुस्लिम धर्माचे लोक या महिन्यात रोजा ठेवतात आणि देवाला प्रार्थना करतात. याचदरम्यान, भारताचा वेगवान स्टार गोलंदाज मोहम्मद शमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रमजान महिना असताना मैदानात शमी ज्यूस पित असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. रमजानमध्ये शमीने ज्यूस पिल्याने बरेली येथील मौलानांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. रमजानमध्ये रोजा ठेवणं प्रत्येक मुस्लीमांचं कर्तव्य आहे. शमीने असं केल्याने इस्लामच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे.
ADVERTISEMENT
शमीवर भडकले मौलाना शहाबुद्दीन रजवी
ऑल इंडिया मुस्लिम जमातीचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना रजवी यांनी मोहम्मद शमीवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, इस्लाममध्ये रोजाचं कर्तव्य म्हणून पालन केलं जातं. प्रत्येक मुस्लिम, मग तो पुरुष असो की महिला रोजा ठेवणं आवश्यक आहे. जर कोणी जाणूनबुजून रोजा ठेवलं नाही, तर तो गुन्हेगार आहे. मोहम्मद शमीने जाणूनबुजून रोजा ठेवलं नाही. इस्लामनुसार हा खूप मोठा गुन्हा आहे.
हे ही वाचा >> Marathi Population in Mumbai: मुंबईत किती मराठी आणि किती गुजराती? ही आकडेवारी पाहून तुम्हीही...
मौलाना रजवी पुढे म्हणाले, मोहम्मद शमीने जे केलं. ते शरीयतनुसार चुकीचं आहे. त्याने खूप मोठा गुन्हा केला आहे. मी त्यांना सल्ला देऊ इच्छितो की, त्यांनी इस्लाम धर्म आणि कर्तव्याला समजून घ्यावं आणि त्यानुसार त्यांनी त्यांचं जीवन जगावं. क्रिकेट खेळणं आणि इतर गोष्टी करणं ठिक आहे. पण अल्लाहने ज्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. त्यांना पूर्ण करणं गरजेचं आहे. शमीला हे समजलं पाहिजे की, त्यांची जबाबदारी फक्त खेळापुरती सीमित नाही. तर धर्मानुसारही आपलं आयुष्य जगलं पाहिजे.
हे ही वाचा >> Jaykumar Gore यांच्यावर आरोप करणारी महिला समोर, काय घडलं होतं सगळं सांगितलं, इशाराही दिला...
शमीला मौलानांनी दिला सल्ला
मौलानांनी हे ही म्हटलं की, इस्लामच्या नियमांचं पालन झालं पाहिजे. शमीने त्यांच्या जबाबदाऱ्या समजल्या पाहिजेत आणि इस्लामच्या कायद्यानुसार आपल्या जीवनात बदल केला पाहिजे. खेळानुसार धर्माची जबाबदारीही प्रत्येक मुस्लिमावर आहे आणि ते कोणत्याही परिस्थितीत पूर्ण झालं पाहिजे.
ADVERTISEMENT
