VIDEO : 'मिया भाई' थेट बांग्लादेशच्या कर्णधारालाच भिडला, सामन्या दरम्यान मैदानात तुफान राडा

मुंबई तक

22 Sep 2024 (अपडेटेड: 22 Sep 2024, 09:41 PM)

Mohmmad Siraj Vs Hossain Shanto : एकीकडे विराट कोहली नागिन डान्स करत बांग्लादेशींना डिवचताना दिसला तर टीम इंडियाचा मिया भाई मोहम्मद सिराज हा बांगलादेशच्या कर्णधाराला भिडताना दिसला. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.

mohammad siraj angry on najmul hussain shanto video goes viral ind vs ban 1 st team india bangladesh

सामन्या दरम्यान मैदानात तुफान राडा

follow google news

बातम्या हायलाइट

point

सिराज बांगलादेशच्या कर्णधाराला भिडला

point

बॉलवर चौकार मारल्यावर दाखवलं बोट

point

मैदानातील राड्याचा व्हिडिओ समोर

Mohmmad Siraj Vs Hossain Shanto : बांग्लादेश विरूद्धचा पहिला कसोटी सामना टीम इंडीयाने 280 धावांनी जिंकला आहे. या विजयासह टीम इंडीयाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या सर्वच खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. तसेच एकीकडे विराट कोहली नागिन डान्स करत बांग्लादेशींना डिवचताना दिसला तर टीम इंडियाचा मिया भाई मोहम्मद सिराज हा बांगलादेशच्या कर्णधाराला भिडताना दिसला. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे. (mohammad siraj angry on najmul hussain shanto video goes viral ind vs ban 1 st team india bangladesh)  

हे वाचलं का?

चैन्नईमधील टेस्ट सामन्याच्या चौथ्या दिवशी ही घटना घडली आहे. मोहम्मद सिराज 46 वी ओव्हर टाकायला आला होता. यावेळी ओव्हरची चौथी बॉल त्याने तो शॉर्ट पीच टाकला. यावेळी स्ट्राईकवर असलेला बांग्लादेशचा कर्णधार बॉल बॉऊन्ड्रीच्या पार मारला होता.  यानंतर सिराजने शांतोला काहीतरी म्हणाला आणि बोटही दाखवले. यावर नजमुल हुसेन शांतोने संयम राखत त्याला हसून उत्तर देण टाळलं. एका बॉलनंतर सिराज पुन्हा शांतोशी वाद घालताना दिसला. सिराज आणि बांगलादेशच्या कर्णधारामधील राड्याचा हा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

हे ही वाचा : Rohit Sharma Video  : "नेहमी काही ना काही...", भारत जिंकला पण रोहित शर्माच्या प्रतिक्रियेमुळं खळबळ

विराटचा नागिन डान्स 

बांगलादेशचा संघ जेव्हा एखादा सामना जिंकतो, तेव्हा त्यांचे खेळाडू नागिन डान्स करतात. आता कोहलीनेही पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना नागिन डान्सची पोज देऊन चाहत्यांचं मनोरंजन केलं. विराटच्या नागिन डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.विराटच्या चाहत्यांनी या व्हिडीओला खूप पसंती दर्शवली आहे.

दरम्यान बांगलादेशकडून नजमुल हुसेन शांतोने दुसऱ्या डावात सर्वाधिक 82 धावा केल्या. मात्र, तरी तो आपल्या संघाचा पराभव टाळू शकला नाही. कारण भारताने तब्बल बांगलादेशसमोर तब्बल 515 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 234 धावांवर गारद झाला. ज्यामुळे भारताने 280 धावांनी दणदणीत विजय मिळवला.

हे ही वाचा : Prataprao Jadhav : ''आम्ही तीन पिढ्या वीज भरलं नाही'', शिंदेंचा मंत्री 'हे' काय बोलून गेला?

 

    follow whatsapp